12 दिवसांनी Bharti Singh ने व्यक्त केली अशी इच्छा, चाहतेही हैराण

कॉमेडी क्वीन भारती सिंहने (comedian bharti singh) काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला आहे. हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह (Haarsh Limbachiya and Bharti Singh) सध्या पालक होणं एंजॉय करत आहेत. दरम्यान मुलाच्या जन्मानंतर केवळ 12 दिवसांनी भारतीने कामाला सुरुवात देखील केली आहे. तिचे शूटिंगच्या सेटवरील व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भारती टॅलेंट हंट रिअॅलिटी शो ‘हुनरबाज: देश की शान’ च्या सेटवर दिसली. शोच्या शूटिंगपूर्वी आणि नंतरही भारती पापाराझींसह नेहमीप्रमाणेबोलतानाही दिसली.
आता भारती सिंहचा (comedian bharti singh) आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या दुसऱ्या मुलाच्या प्लॅनिंगबद्दल बोलत आहे. या व्हिडीओमध्ये, पापाराझींशी संवाद साधताना भारतीने गंमतीत म्हणते आहे की तिच्या बेबी बॉयसाठी बहिण असावी याचं प्लॅनिंग करायला हवं. पोस्ट रॅप अप व्हिडिओमध्ये, भारती सिंह तिच्या दुसऱ्या मुलाच्या प्लॅनिंगबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी देखील तिचा विनोदी अंदाज पाहायला मिळाला.
काय म्हणाली भारती सिंह?
भारती सिंहचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. ज्यामध्ये पॅप्स भारतीला असं विचारत आहेत की, ‘भारतीजी एका बाळाची आई झाल्यानंतर आयुष्य किती बदलले आहे?’ ज्याचे उत्तर देताना कॉमेडी क्वीनने असे उत्तर दिले की, ‘असे मनात येत आहे की, आणखी एक बाळ व्हायला हवे.’
भारती पुढे म्हणाली की, ‘लोक त्रास देऊ लागले आहेत. मुलगा असेल तर त्याला बहीण हवी असे म्हणतात. मुलगी असेल तर तिला भावाची गरज आहे असे म्हणतात. म्हणजे आपण अशा जोड्या बनवत राहिले पाहिजे.’ त्याआधी भारती 12 दिवसांच्या मुलाला घरी ठेवून कामावर येण्याबाबत बोलताना दिसली होती. तिच्यासाठी हा निर्णय किती कठीण होता याबाबत ती व्यक्त झाली होती.
भारती आणि हर्ष 3 एप्रिल रोजी बाळाचे पालक झाले. ज्याला ते प्रेमाने ‘गोला’ असं म्हणतात. मुलाला सोडून कामावर येण्याबाबत बोलताना भारती म्हणाली की, ‘मी व्हिडीओ कॉलवरही पाहिलं आणि त्यानंतर मला रडू आलं. पण मी म्हटलं- शो मस्ट गो ऑन. बाळ लहान आहे त्यामुळे त्याला आई-वडिलांची ओळख नाही आहे. त्यामुळे ते दूध पितं आणि झोपी जातं. मला फक्त पॅक अप करुन घरी जावसं वाटत आहे.’
हेही वाचा :