डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नागराज मंजुळेंचा मोठा सन्मान

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. त्यानंतर आता नागराज मंजुळेंच्या नावापुढे आता डॉक्टर हे बिरुद लागणार आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून (university) नागराज मंजुळे यांचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा हनुमंत लोखंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा हनुमंत लोखंडे यांनी नुकतंच फेसबुकवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. नागराज मंजुळे यांनी डॉक्टर पदवी स्विकारतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी म्हटले की, “एम.फिल किंवा SET/NET परीक्षांवर मात करण्यासाठी पुणे विद्यापीठात अंधारलेल्या दिवसात चकरा मारतानाचे तुमचे दिवस आठवतात. तेव्हा मला तुझ्यासाठी हीच इच्छा होती.”
“चार्ली चॅप्लिन म्हणतो, अपयश हे बिनमहत्त्वाचे असते. स्वतःला मूर्ख बनवण्यासाठी धैर्य लागते. तुम्ही अपयशाच्या झळा सोसत होता पण संघर्षापुढे तुम्ही कधीही हार मानली नाही. तुमचा दहावी इयत्ता सोडल्यापासून ते डी.लिटपर्यंतचा एक अविश्वसनीय, स्वप्नवत प्रवास आहे. अनेक प्रतिष्ठित चित्रपटांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे सन्मानित झाल्यानंतर आता डी वाय पाटील विद्यापीठाद्वारे (university) तुम्हाला डॉक्टर ऑफ लेटर्स (D. Litt.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येत आहे. याचा साक्षीदार होणे हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.”
“इतिहासात तुमचे नाव ‘द फेमस फेल्युअर्स’मध्ये आधीपासूनच आहे आणि सन्मानासाठी शिक्षणात एवढी सर्वोच्च पदवी मिळवणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. डॉ. नागराज मंजुळे तुम्हाला फार फार शुभेच्छा. तुमच्या स्टडी रूममध्ये लावण्यासाठी एक परिपूर्ण फ्रेम! मित्र-तत्वज्ञ-मार्गदर्शक म्हणून माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असे प्रा हनुमंत लोखंडे म्हणाले.
हेही वाचा :