दीपिका पदुकोणकडे मोठी GOOD NEWS…

deepika padukone

अभिनेत्री  दीपिका पादुकोण (deepika padukone) हिने बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली..दीपिकाचं सौंदर्य तिच्या चाहत्यांना नेहमीच भुरळ घालतं.अनेक सिनेमांमधून दीपिकाने तिचं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता आणखी एक मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी दीपिका सज्ज आहे.

deepika padukone

आता  75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाच्या (deepika padukone) नावाचा समावेश झाला आहे. दीपिकानं याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.

फ्रान्समधील प्रसिद्ध अभिनेता विंसेट लिंडन यांना फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.  तसेच दीपिका ही पॅनल सदस्य आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल हे या वर्षी 17 मे ते 28 मे या दरम्यान आयोजित केले जाणार आहे.

deepika padukone 1

यापूर्वी दीपिका या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा दीपिकाने तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या  फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचे लूक हे चर्चेत असतात.

deepika padukone 3

दीपिकानं ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘गेहरांईया’ या चित्रपटामध्ये  या चित्रपटामधील दीपिकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

deepika padukone 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *