अजून किती सहानभूती मिळवशील…त्या पोस्टमुळं दीपिका झाली ट्रोल
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपेकी एक असणाऱ्या दीपिका पादुकोणची कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चा होत असते. दीपिकाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब चित्रपटावर तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. बोल्ड दृश्यं आणि प्रमोशनसाठी दीपिकानं केलेल्या पेहरावांवर (social media post) टीका झाली. आता पुन्हा दीपिका नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
दीपिकानं नुकतंच एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी ग्लॅमरस फोटोशूट केलंय. या फोटोशूमधील काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो शेअर (social media post) करताना दीपिकानं लिहिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांना खटकत आहे, त्यामुळं तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
दीपिकानं Allure या मासिकासाठी हे फोटोशूट केलंय. ‘माझ्या रंगावरून अनेकदा मला बोललं गेलं. आणि आज एका सर्वात प्रसिद्ध सौंदर्य मासिकावर आज माझा फोटो आहे. पण इथवरचा प्रवास सोापा नव्हता. शिकत, चुकत माझी वाटचाल सुूरू राहिली आणि या टप्प्यावर पोहोचले, असं दीपिकानं लिहिलं आहे.
दीपिकानं लिहिलेल्या कॅप्शनमुळं नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. वडिल प्रसिद्ध खेळाडू होते. मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री तरीही इथवरचा प्रवास सोपा नव्हता…असं कसं लिहू शकते, असं एक म्हणत दीपिकाला ट्रोल केलं आहे.
सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल दीपिकानं नुकतंच मत व्यक्त केलं. ‘टीका करणारांना ट्रोल करणारांना खुशाल त्यांचं काम करू देत, मी माझं काम करत राहीन,’ असं ती म्हणते.
हेही वाचा :