सेलिब्रिटी लेकी कोट्यवधींची कमाई करत असूनही, आईची ‘ही’ दुर्दशा

कोरोनामुळं आपल्या आयुष्यात आलेल्या अतिशय आव्हानात्मक प्रसंगाला, दिवसांना आता दोन वर्षांचा काळ उलटून गेला. पण, तरीही त्या दिवसांच्या आठवणी मात्र आजही कायम आहेत. या महामारीनं फक्त जगण्यावरच नव्हे, तर पोटापाण्याच्या साधनांवरही थेट परिणाम केले. सर्वाधिक नुकसान झालं ते म्हणजे कलाजगताचं.(celebrity)
लॉकडाऊन काळात बऱ्यात मालिकांचं, चित्रपटांचं चित्रीकरण बंद बोतं. परिणामी अनेक (celebrity) कलाकारांना त्यांच्याकडे असणाऱ्या पैशांवरच उदरनिर्वाह करावा लागला होता.
हिंदी आणि दाक्षिणात्य कलाजगतात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या अशाच दोन अभिनेत्रींच्या आईनंही अशाच प्रसंगांचा सामना केला. या सेलिब्रिटी आहेत श्रुती हासन आणि अक्षरा हासन.
अभिनेते कमल हासन यांच्या या मुली आणि आव्हानाचा काळ झेलणारी या मुलींची आई, म्हणजे अभिनेत्री सारिका (Sarika).
एका मुलाखतीतच सारिका यांनी त्याच्यावर ओढावलेल्या या प्रसंगावर वक्तव्य केलं. आपण व्यासपीठावर काम करण्यात सुरुवात केली आणि पाच वर्षांमध्ये सर्वकाही बदललं असं त्यांचं म्हणणं.
‘लॉकडाऊन संपलं आणि पैसेच संपले… अशा परिस्थितीत तुम्हीच सांगा कुठे जायचं? तुम्ही अभिनय क्षेत्रात परत येता कारण तुम्हाला फक्त 2 ते 2700 रुपये मिळतात. हा अतिशय संवेदनशील निर्णय होता. सुरुवातीला वाटलं हा निर्णय फक्त वर्षभरच टिकेल पण, असं झालं नाही’, असं म्हणत आपण पाच वर्षे व्यासपीठासाठी काम करत राहिलो आणि तो काळ खास होता असं सारिका म्हणाल्या.
एकिकडे मुली कोट्यवधींचं मानधन घेत असतानाच तिथं सारिका मात्र दोन- अडीच हजार रुपयांसाठी जीवाचा आटापिटा करत होत्या. अर्थात यामध्ये त्यांना आनंद मिळत होता, ही बाब मात्र नाकारता येणार नाही.
सारिका यांच्यावर आलेली ही वेळ मन हेलावणारी होती. पण, त्यातही त्यांनी स्वत:ला तारून नेलं.
चित्रपटांपासून जवळपास 5 वर्षे दुरावलेल्या सारिका यांनी ‘मॉडर्न लव: मुंबई’तून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :