अभिनेता अभिजीत गुरुच्या पत्नीला पाहिलंत का?

सेलिब्रेटींच्या(celebrities) पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.

आज आम्ही तुम्हाला अभिनेता अभिजीत गुरूबाबत(celebrities) सांगणार आहोत.

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे अभिजीत आणि त्याच्या पत्नीची(celebrities). माझी नवऱ्याची बायकोमध्ये मालिकेमध्ये KD ही भूमिका साकारून अभिजीतने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. परंतु, केडी अभिनेता असण्यासोबतच उत्तम पटकथालेखक आणि संवादलेखक देखील आहे. अनेक मालिका, चित्रपट यांच्यासाठी पटकथा लिहिणाऱ्या अभिजीतची पत्नीदेखील कलाविश्वात सक्रीय असून ती मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिजीतच्या पत्नीचं नाव समिधा गुरु असं असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

 समिधा आणि अभिजीत शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे प्रथम या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. विशेष म्हणजे समिधा किंवा अभिजीत यापैकी कोणीही एकमेकांना प्रपोज केलेलं नाही. मात्र, एकमेकांना त्यांच्या मनातील भावना समजल्या आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. अभिजित गुरूने ‘अवघाची संसार’ या मालिकेद्वारे संवादलेखनाला सुरुवात केली. तर समिधाने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. समिधा आणि अभिजीतला एक मुलगीदेखील आहे.

Smart News:-

ऑस्ट्रेलियात दिसला दुर्मीळ पांढरा कांगारू, फोटो सोशल मीडियावर व्हायरल


मुकेश अंबानी व्हायचंय? मग १ कोटी ७४ लाख वर्षे काम करा!, काय आहे ही भानगड वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *