माचिस एवढी छोटी पर्स घेऊन फिरतेय दिशा पाटनी…!

matchbox

अभिनेत्री दिशा पाटनी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत  आहे. कारण ती एक छोटी पर्स घेऊन फिरताना दिसत आहे. माचिस (matchbox) एवढ्याशा या पर्समध्ये नक्की काय, असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी ‘हिरोपंती 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि याचदरम्यान त्याच्या कथित गर्लफ्रेंड दिशा चर्चेत आहे.

दिशाचा व्हिडिओ व्हायरल

अलीकडेच टायगरच्या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली होती आणि त्यापैकी एक होती दिशा पाटनी. टायगर श्रॉफचा बहुप्रतिक्षित चित्रपट हिरोपंती 2 आज चित्रपटगृहात दाखल होणार आहे. टायगर श्रॉफ आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण टायगर श्रॉफने त्याच्या पहिल्या पार्टच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला होता.

हीरोपंती 2 मध्ये (Heropanti 2) तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काल रात्री मुंबईत हिरोपंती 2 च्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यादरम्यान टायगर श्रॉफ याचा सिनेमा पाहण्यासाठी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी आले होते. हिरोपंती 2च्या स्क्रिनिंगवेळी टायगर श्रॉफची खास मैत्रीण दिशा पाटनी ही दिसली होती. स्क्रिनिंगमधून दिशा पटनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एक विचित्र बॅग घेऊन जाताना दिसला

दिशा पाटनी हिरोपंती 2 च्या स्क्रीनिंगमध्ये फिकट जांभळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये उठून दिसत होती. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. व्हायरल व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की दिशा स्क्रीनिंगपूर्वी मीडिया पापाराझींसमोर मस्त पोज देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचं लक्ष दिशा पटनीच्या हॅण्ड बॅगकडे गेले आणि मग काय…? काल रात्रीपासून दिशा पटनीच्या नवीन व्हिडिओवर लोक सतत कमेंट करत आहेत. वास्तविक यावेळी दिशा पटानी एक अतिशय छोटी बॅग घेऊन जाताना दिसली. आता दिशा पाटानीच्या बॅगच्या (पर्स) आकाराची बरीच चर्चा आहे. या व्हिडिओवर एका यूजरने कमेंट केली आहे की, ‘दिशा या छोट्या बॅगमध्ये काय ठेवेले असेल, याचा विचार करुन मला आश्चर्य वाटते?’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘या बॅगेत काय ठेवले असेल?’ दुसर्‍या एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘हे हातात नसते तर ते हवेत उडाले असते.’

टायगरच्या अगदी जवळली व्यक्ती दिशा

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली आहे. या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. गेल्या महिन्यात टायगर श्रॉफच्या वाढदिवशी दिशा पाटनीने त्याचे खास अभिनंदन केले होते आणि त्याला आपला चांगला मित्रही म्हटले होते. तेव्हापासून त्यांच्या ब्रेकअपची लोकांमध्ये बरीच चर्चा होती. सध्या दोघेही पूर्वीप्रमाणेच प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देताना दिसत आहेत.

हेही वाचा:


इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी भारताने केली कमाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *