‘हे’ फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने होऊ शकतात साईड इफेक्टस् , जाणून घ्या सविस्तर

रसरशीत, चवीला मधुर असा आंबा(Mango) उन्हाळ्याच्या हंगामात खाल्ल्याशिवाय राहावतच नाही. जिभेला सुखद चव देणाऱ्या आंब्यामध्ये आरोग्यदायी गुणधर्म भरपूर आहेत. फायबर, कॅलरी, जीवनसत्त्व सी, फोलेट, प्रथिने, जीवनसत्त्व बी 6, ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारख्या अनेक पोषक समृद्ध असणारा आंबा या दिवसांत आवर्जून खाल्ला जातोच, मात्र काही जणांना आंबा फारच आवडतो.
त्यामुळे आंबा(Mango) अति जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरावर साईड इफेक्टही होऊ शकतात. याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया आंब्याच्या अति सेवनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम.
हाय ब्लड शुगर
चवीला उत्तम, रसदार आंब्यामध्ये नैसर्गिकत: साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे ज्यांना मधुमेह आहे अशांनी आंब्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तिंनी आंब्याचे आहारातील प्रमाण मर्यादित ठेवणे किंवा आंबे खाण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लो फायबर
आंब्याच्या काही जाती अशा आहेत ज्यामध्ये फायबरचे प्रमाण त्यातील कोय आणि सालीपेक्षा कमी प्रमाणआत आढळते. आंब्यातील हे दोन्ही लोकं खात नाहीत. ग सहसा याकरिता ज्या आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त अआहे अशा जातीचे आंबे खाण्याचा सल्ला देतात. यामुळे पचनक्रियाही सुरळीत राहते. पचनविकार होत नाहीत.
वजन वाढणे
आंबा(Mango) अति जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वेगाने वाढू शकते. याचे कारण इतर फळांपेक्षा आंब्यामध्ये कमी कॅलरी, नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते शिवाय हाय कॅलरीही असतात. यामुळे आंब्यामुळे वनज वाढण्याची शक्यता असते.
पचनविकार
जीआय डिस्ट्रेस (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिस्ट्रेस) हा विकार आहारात आंब्याचे अतिजास्त प्रमाणात सेवन केल्याने हो शकतो. आंब्यामध्ये कार्बोहायड्रेट आयबीएस म्हणजे इरिटेबल बोवेल सिंड्रोमला चालना मिळते यामुळे पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात.
एनाफिलेक्टिक शॉक
आंब्याचा समावेश आहारात जास्त प्रमाणात केल्याने काही जणांना एनाफिलेक्टिक शॉक ही समस्या उद्भवू शकते. ही अॅलर्जीक रिअॅक्शन असून यामुळे मळमळ, उलट्या अशा प्रकारची लक्षणे शरीरावर जाणवू शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास व्यक्ति बेशुद्धही पडू शकते.
टोलनाक्यावरून प्रवास करत असाल तर पेट्रोल ते अँबुलन्सपर्यंत या सुविधा मिळतात मोफत
दिल्लीत मास्क पुन्हा अनिवार्य, मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड
योगी सरकारच्या नियमांचं पालन, कृष्ण जन्मभूमी मंदिरानं बंद केले लाऊडस्पीकर्स
भारतात कोविड संसर्गाच्या ‘आर व्हॅल्यू’त वाढ; राज्यांची स्थिती पाहा