ऐश्वर्याच्या डोळ्यात काय आहे खास?

बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी ऐश्वर्या रॉय बच्चनने नुकतीच कान्स फिल्म फेस्टिवल २०२२ (cannes film festival 2022) सोहळ्यात एन्ट्री केली आहे. या सोहळ्यातील तिच्या लूकवर चाहत्याच्या नजरा खिळल्या. यातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान तिच्या डोळ्यांच्या नजाकतीने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले. तर ऐश्वर्याने आपल्या डोळ्यांचा रंग कधी-कधी अचानकपणे का बदलतो? याबद्दल मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन कान्स फिल्म फेस्टिवल २०२२ च्या (cannes film festival 2022) रेड कार्पेटवर धमाकेदार एन्ट्री केली. तिच्या एन्ट्रीनंतर चाहत्याच्या नजरा तिने घाललेल्या ड्रेसवर खिळल्या. या सोहळ्यात ऐश्वर्याच्या ब्लॅक रंगाच्या रफल, फ्लॉवर गाऊनसोबत तिच्या न्यूड मेकअपने चार चॉंद लावले. ऐश्वर्याने हा लूक पूर्ण करताना कोणतीच कसर कमी केली नाही. या सोहळ्यातील ऐश्वर्याचे दोन लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत.(cannes film festival 2022)

यातील खास म्हणजे, हा गाऊन समोरून प्लंज नेकलाइन आणि तिच्या उजव्या हाताच्या बाजूने त्याच्यावर रंगीबेरंगी फुले दिसत होती. या लूकमध्ये ऐश्वर्या एखाद्या फुलासारखी दिसत होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये CANNES QUEEN 🖤🌹,’ असे लिहिले आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले तर काही चाहत्यांनी तिला ट्रोलदेखील केले आहे. यात एका नेटकऱ्याने ‘तिचा मेकअप आवडला नाही’, ‘आता तिच्याकडे पूर्वीसारखे सौंदर्य राहिले नाही’. असे म्हटले आहे.

याच दरम्यान ऐश्वर्या रॉयने एका मुलाखतीत आपल्या डोळ्यांचा रंग कधी-कधी अचानकपणे का बदलतो? याबद्दल मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. यात तिने आपल्या डोळ्याचा रंग बदलत असून कधी-कधी घारे, निळे आणि हिरवे दिसत असल्याचे सांगितले आहे. तसेच आपले डोळे नैसर्गिकरित्या घारे असून त्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांचा रंग कधी गडद हिरवा तर निळा दिसतो. परंतु, मादाम तुसादमधील ऐश्वर्या रॉयच्या पुतळ्यांमध्ये दिसणारा डोळ्यांचा रंग हा मूळ रंग असल्याचे तिने म्हटले आहे.

 

ऐश्वर्याने तिच्या डोळ्यांशी संबंधित एक अतिशय मजेशीर गोष्ट सांगितली आहे. ‘सरबजीत’ चित्रपटासाठी तिला ब्राऊन रंगाची लेन्स डोळ्यात घालावी लागली होती. ऐश्वर्याने एका डोळ्यात लेन्स लावल्यानंतर मुलगी आराध्याची नजर माझ्यावर पडली. आराध्याने हे पाहताच ‘ओ मिनियन’ म्हणू लागली. ओ मिनियन कार्टूनमधील एका पात्राचा एक डोळा ब्राऊन आणि एक ग्रीन असतो असेही तिने यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा :


मल्टीबॅगर केमिकल स्टॉकचा एका वर्षात 110% परतावा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *