The Kashmir Files साठी या चित्रपटाने घेतली ‘पुन्हा येईन’ची भूमिका

entertainment news – सध्या संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे ती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडत आहे. यात या चित्रपटासोबत चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देत नाही. यामुळेच गुजरातमध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाला चित्रपटगृहातून हटवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पहिल्या वीकेंडनंतर सोमवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली. जवळपास ६५० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सोमवारपर्यंत अडीच हजार स्क्रीन्सचा टप्पा गाठणार अशी परिस्थिती आहे. छोट्या शहरांमधून या चित्रपटाची वाढती मागणी लक्षात घेता हा चित्रपट संपूर्ण भारतात पाहिला जात असल्याचे दिसून येत आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या लोकप्रियतेला पाहता त्याचा परिणाम हा मेट्रो शहरांमध्ये होत आहे. तर गुजरातमध्ये गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम एपिसोड’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनुसार ते हा चित्रपट पुन्हा एका नव्या तारखेला प्रदर्शित करणार आहेत. तर, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, निर्मात्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या लोकप्रियता याचे कारण असल्याचे म्हटले (entertainment news ) आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘बच्चन पांडे’ अक्षय कुमारच्या या चित्रपटासमोरही अडचणी आहेत. चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले असले तरी, ज्या स्क्रीनसाठी हे बुकिंग सुरू झाले आहे, त्यासाठी थिएटर मालकांनी चित्रपटगृहातून काही चित्रपटांना हटवावं लागेल. तर या सगळ्याचा फटका हा संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी आणि अमिताभ बच्चन यांच्या झुंड या चित्रपटावर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा :