बेबी डॉल सनी लिओनी आता थिरकणार शांताबाई गाण्यावर

entertainment news – सनी लिओनीनं सध्या प्रादेशिक चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत दोन ते तीन चित्रपटांचं काम ती करत आहे. लवकरच ती एका मराठी चित्रपटातही दिसणार असल्याचं कळतंय.

‘शांताबाई’ या गाजलेल्या मराठी गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये सनी झळकणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी २०१७ मध्ये आलेल्या ‘बॉइज’ या चित्रपटातल्या ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’ या गाण्यात सनी झळकली.

‘शांताबाई’ या संजय लोंढे यांच्या गाण्याचं रिक्रिएशन नितीन सावंत यांनी त्यांच्या आगामी ‘आमदार निवास’ या चित्रपटासाठी केलं आहे. संजीवकुमार राठोड या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या गाण्यात सनी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार (entertainment news) आहे. या गाण्यात सनीसोबत सयाजी शिंदे आणि रोहित चौधरी हे कलाकारही दिसणार आहेत. सनीच्या नृत्याचे चाहते या गाण्याची आतुरतेनं वाट पाहतील एवढं नक्की.


हेही वाचा :


दहावी-बारावी निकालाबाबत महत्वाची बातमी…


हृतिक रोशनच्या नव्या लूकवर गर्लफ्रेंड फिदा…


मुल होत नाही म्हणून पतीने केले पत्नीचा दुर्दैवी अंत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *