घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचं परदेशी मॉडेलशी अफेअर..;

अभिनेता सैफ अली खानचे (Saif Ali) त्याची पहिली पत्नी अमृता सिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर (model) मॉडेलशी अफेअर सुरू झाले होते. ही परदेशी मॉडेल होती. पण, अफेअर सुरू असतानाच तिने त्या मॉडेलपासून आपले सर्वात मोठे सत्य लपवले होते.
२००४ साली आपल्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अमृता सिंग होती. तिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खानची इटालियन मॉडेल (model) रोजा कॅटालानोसोबतची जवळीक वाढली होती. पण या अभिनेत्याने आपले एक फार मोठे रहस्य लपवून ठेवले होते. जे त्याने कधीच मॉडेलला सांगितले नव्हते.
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान अनेकदा त्याच्या फिल्मी करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असतो. सैफ अलीच्या करिअरला सुरुवातही झाली नव्हती, तेव्हा त्याने १९९१ मध्ये आपल्या काळातील टॉप अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले. सैफच्या घरच्यांना त्याने हे लग्न करावे असे वाटत नव्हते, पण त्याने कुणाचेही न ऐकता तिच्याशी लग्न केले.
त्यावेळी सैफ अमृता सिंहपेक्षा १२ वर्षांनी लहान होता. याच कारणामुळे दोघांचे लग्न टिकू शकले नाही, असे म्हटले जाते. जेव्हा अमृता सिंगने सैफसोबत लग्न केले तेव्हा तिची कारकीर्द शिगेला पोहोचली होती, पण लग्नानंतर ती हळूहळू फिल्मी जगापासून दूर गेली. तिने घर आणि मुलांसाठी जास्त वेळ दिला, पण तरीही तिला तिचं लग्न टिकवता आलं नाही. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांना दोन मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान आहेत.
लग्नाच्या १३ वर्षानंतर सैफ आणि अमृता सिंग यांचा २००४ मध्ये घटस्फोट झाला आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. अमृता सिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफची इटालियन मॉडेल रोजा कॅटालानोसोबतची जवळीक वाढल्याचे बोलले जात आहे.
माहितीनुसार, सैफ आणि रोजा यांची पहिली भेट केनियामध्ये झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेम बहरू लागले आणि रोजा सैफच्या मागे लागली आणि ती भारतात गेली. मात्र, या दोघांचे नातेही फार काळ टिकले नाही.
सुमारे दोन वर्षांनी त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपबद्दल बोलताना, रोजाने स्वतः एकदा एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ‘भारतात आल्यानंतर तिला कळले की सैफ घटस्फोटित आहे आणि त्याला दोन मुले आहेत’. इतकंच नाही तर सैफच्या मूड स्विंगच्या समस्येने रोजाही हैराण झाली होती. सैफने रोजाला कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व कारणांमुळे दोघेही वेगळे झाले. यानंतर सैफने २०१२ मध्ये करीना कपूर खानसोबत दुसरे लग्न केले.
हेही वाचा :