सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन

मराठी सिनेमा (marathi cinema) आणि मालिकांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते अरविंद धनू यांचे काल सोमवारी (दि. २५ जुलै) रोजी सायंकाळी निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथेच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. आपल्या दमदार अभिनयासाठी तसेच आव्हानात्मक भूमिकांसाठी ते प्रसिद्ध होते.

अरविंद धनू यांनी छोट्या पडद्यावरील ‘लेक माझी लाडकी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. गिरणगावातील नवहिंद बालमित्र मंडळाच्या भोंगो तसेच विविध नाटकात काम करुन (marathi cinema) त्यांनी राज्य नाट्य आणि कामगार रंगभूमी गाजविली.

तसेच रंगभूमीवरील ‘स्वामी’ या नाटकातील त्यांची स्वामींची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती. ‘क्राईम पेट्रोल’मधील त्यांची पोलिस अधिकाऱ्याची भूमिकाही प्रचंड गाजली होती. याच भूमिकांनी त्यांना सिने जगतात नवी ओळख मिळवून दिली. गाजलेल्या मालिकांसोबतच अरविंद धनू यांनी ‘एक होता वाल्या’ या मराठी सिनेमात काम केले आहे. अरविंद धनू यांच्या अचानक निधनामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच चाहते सोशल मीडियावरून शोक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :


मुलीनंतर दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी निक प्रियांका सज्ज

Leave a Reply

Your email address will not be published.