प्रेग्नेंसी दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये वाढ..!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री (pregnancy) सोनम कपूरने चाहत्यांना आणि कुटुंबाला आनंदाची बातमी दिली. गेल्या महिन्यात सोशल मीडियावर पती आनंद अहूजासोबत फोटो शेअर करत लवकरचं आई होणार असल्याची माहिती तिने चाहत्यांनी दिली. फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी तिला आणि आनंदला शुभेच्छा दिल्या. पण प्रेग्नेंसीच्या तीन महिन्यांनंतर सोनम अनेक गोष्टींचा सामना करत आहे.

नुकताचं दिलेल्या एका मुलाखतीत (pregnancy) सोनम म्हणाली, ती तीन महिन्यांची गरोदर आहे, पण सर्व काही प्रचंड कठीण आहे. आई होण्याचा प्रवास फार कठीण असल्याचं देखील तिने या मुलाखतीत सांगितलं आहे.

सोनम म्हणाली, ‘प्रेग्नेंसीमध्ये तुमचं शरीर रोज बदलत असतं. रोज एक नवीन अनुभव येत असतो. अनेक वेळा तर मला झोप देखील लागत नाही. कारण मला सतत बाथरूमला जाव लागतं…’

ती पुढे म्हणाली, ‘प्रेग्नेंसी आधी मी 10 ते 12 तास झोपायची तेव्हा मला कोणीचं उठवायचं नाही…’ एवढंच नाही तरी आई होणं एक आशीर्वाद असल्याचं देखील सोनम म्हणाली…

सोनम कपूर अहूजाच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तिच्या आगामी सिनेमाचं नाव ‘ब्लाइंड’ आहे. 2011 मध्ये आलेल्या कोरियन सिनेमा ‘ब्लाइंड’चा रिमेक आहे. या सिनेमात सोनमसोबत पूरब कोहली, विनय पाठक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :


कोल्हापूर पराभवामुळे चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार काय? तुमचे मत नोंदवा

Leave a Reply

Your email address will not be published.