कॅन्सरला नमवून प्रसिद्ध अभिनेत्री 9 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर…!

कॅन्सर (cancer) सारख्या गंभीर आजावर मात केल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे 9 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनाली पुन्ही चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण यावेळी सोनाली एक वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आता सोनाली न्यूज अँकर भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे सोनालीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सोनाली ‘ द ब्रोकन न्यूज’ सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवल्यानंतर सोनालीची ओटीटी प्लॅटपॉर्मवर धमाकेदार एन्ट्री होणार आहे.(cancer)

cancer

खुद्द सोनाली बेंद्रेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘द ब्रोकन न्यूज’ वेब सीरिजचा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये त्याच्यासोबत जयदीप अहलावत आणि श्रेया पिळगावकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

‘द ब्रोकन न्यूज’ वेब सीरिजच्या टीझरमध्ये न्यूजरूमची झलक एक दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये जयदीप अहलावत आणि सोनाली बेंद्रे त्यांच्या पात्रांची नावे सांगताना दिसत आहेत.

 

सीरिजचा टीझर शेअर करत सोनालीने कॅप्शनमध्ये, ‘ब्रोकन आणि ब्रेकिंग न्यूजमधली रेषा धूसर असताना तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार? ‘ असं लिहिलं आहे.

हेही वाचा :


राज्यावरील भारनियमनाचं संकट टळलं..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *