तेलुगू चित्रपटसृष्टीतील खलनायक हरपला

तेलुगू चित्रपटसृष्टीतील चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते (Famous senior actors) कैकला सत्यनारायण यांचे निधन झाले आहे. कैकला सत्यनारायण दीर्घकाळापासून वयोमानाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. कैकला यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कैकला सत्यनारायण यांच्यावर बराच काळ रुग्णालयात उपचार सुरू होते. कैकला सत्यनारायण यांनी आज सकाळी (२३ डिसेंबर,२०२२) जगाचा निरोप घेतला.

कैकला सत्यनारायण (Famous senior actors) यांच्या कुटुंबावर यावेळी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कैकला हे तेलगू चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. त्यांचा चाहता वर्ग सुद्धा तितकाच मोढ आहे. ही बातमी समजल्यानंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत चाहते कैकला सत्यनारायण यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहे.

कैकला यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर त्यांनी 10 एप्रिल 1960 रोजी नागेश्वरम्मा यांच्याशी विवाह केला. कैकला यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. कैकला यांनी त्यांच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत 750 चित्रपटांमध्ये काम केले. कैकला सत्यनारायण हे दिग्गज अभिनेते एनटी रामाराव यांच्या खूप जवळ होते. (Actor)

अभिनयासोबतच कैकला राजकारणात सुद्धा सक्रिय होते. कैकला यांनी अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास सुरू केला होता. त्यांच्या अभिनयाची पहिली दखल डीएल नारायण यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी कैकला यांना १९५९ मध्ये ‘सिपाही कुथुरु’ या चित्रपटात भूमिका ऑफर केली.

हेही वाचा :