प्रसिद्ध गायकाची Brain Tumor शी झुंज अपयशी..!

प्रसिद्ध ब्रिटिश-आयरीश बँड ‘द वाँडेड’  मधील पाच गायकांपैकी असणाऱ्या टॉम पार्करचे  वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी निधन झाले आहे.तो गेल्या दोन वर्षांहूनही कमी काळापासून (brain tumor) ब्रेन ट्यूमरशी झुंज देत होता, मात्र त्याचा या आजाराशी असणारा लढा अपयशी ठरला आहे. इंग्लंडमधील मधील या गायकाच्या आजाराने निदान ऑक्टोबर 2020 मध्ये झाले होते.

त्यावर उपचार घेतल्यानंतर रियूनियन टूरसाठी तो बाकी बँड सदस्यांसह होता. दरम्यान टॉमची पत्नी अभिनेत्री केल्सी हार्डवीक (Kelsey Hardwick) हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असे म्हटले आहे की, ‘आम्ही अत्यंत जड अंतःकरणाने पुष्टी करतो की टॉमचे आज (brain tumor) निधन झाले, यावेळी संपूर्ण कुटुंबीय त्याच्यासह उपस्थित होते.

आमचं हृदय तुटलं आहे, टॉम आमच्या विश्वाच्या मध्यस्थानी होता आणि त्याच्या सर्वांमध्ये पसरणाऱ्या हास्याशिवाय आणि एनर्जीने भरलेल्या अस्तित्त्वाशिवाय आयुष्याची कल्पना आम्हाला करता येत नाही आहे.’ टॉमच्या पश्चात त्याच्या पत्नीसह दोन मुलं देखील आहे. यापैकी एकाचा जन्म त्याच्या आजाराचं निदान झाल्यानंतर झाला होता.

त्याच्या बँडमधील सदस्यांनी असे म्हटले आहे की, ‘तो आमचा भाऊ होता, शब्दातून आमचे झालेले नुकसान आणि आम्हाला जे दु:ख झालं आहे ते मांडता येणार नाही. नेहमी आणि कायमस्वरुपी आमच्या मनात राहशील.’ टॉम आणि केल्सीचे लग्न 2018 मध्ये झाले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर, या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. ऑक्टोबर 2020 मध्ये टॉमला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते, त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी सुरू होती पण अखेर त्याने जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा :


राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *