प्रसिद्ध गायकाने 5 स्टार हॉटेलबाबत केला धक्कादायक खुलासा!

बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य सामान्य लोकांना खूप आकर्षक आणि आरामदायी वाटतं. कारण, त्यांच्या आयुष्यात पैसा, प्रसिद्धी ते सुखसोई असं सर्व काही आहे. त्यामुळे त्यांच्यासारखं आयुष्य जगावं हीच प्रत्येकाची इच्छा असते. पण, सेलेब्सचं आयुष्य तुम्हाला वाटतं तितकं सोपं नसतं. काही वेळा त्यांना समस्यांनाही सामोरं जावं लागतं. अनेक वेळा सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा खुलासा केला आहे.(five star hotel)
अलीकडेच राहुल बोस यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या एका विचित्र घटनेचा उल्लेख केला होता.जिथे केळी ऑर्डर केल्यांनतर त्यांना हजारोंच बिल द्यावं लागलं होतं. त्यांनतर आता गायक अंकित तिवारीने (Ankit Tiwari) 5 स्टार हॉटेलमध्ये आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल सांगितले आहे.पाहूया नेमकं काय घडलंय.
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सहज व्यक्त होता येतं. अंकित तिवारीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने दिल्लीतील एका (five star hotel) पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्याशी अत्यंत वाईट वागणूक दिल्याचे सांगितले आहे.ऐकतच नव्हे तर हॉटेल कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या मुलीला रात्रभर उपाशी राहावे लागले. व्हिडिओमध्ये अंकित तिवारीने सांगितले की, तो दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील रॉयल प्लाझा हॉटेलमध्ये थांबला होता.पण, या हॉटेलमध्ये ना अन्न होते ना पाणी. रात्री दीड वाजता हॉटेलजवळ खायला काहीच नव्हते. व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, त्याचे कुटुंब हॉटेलमध्ये होस्टेससारखे वाटत होते. अंकितने सांगितले की, जेवणाची ऑर्डर देऊन तब्बल ४ तास झाले आहेत, पण अजूनही जेवण किंवा पाण्याची व्यवस्था झालेली नाहीय.
हॉटेल व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी बाऊन्सरचीसुद्धा धमकी दिल्याचा दावा त्याने केला आहे. अंकितने ट्विटरवर एकूण 1 मिनिट 29 सेकंदांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. जे हॉटेलच्या लॉबीमध्ये शूट करण्यात आले होते. जिथे अंकितसोबत इतर लोकही उपस्थित होते. अंकितने सांगितले की, तो काल रात्रीपासून इतका अस्वस्थ आहे की तो पहाटे 5 वाजता झोपी गेला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अंकित सांगतो की तो आपल्या कुटुंबासह हरिद्वारला गेला होता. त्यानंतर एक दिवस दिल्लीत राहण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यानंतर त्यांना वृंदावनला जावे लागले. पण, तो रॉयल प्लाझा हॉटेलमध्ये आपली मुलगी आणि पत्नीसह राहिला. परंतु, येथे चेक-इन करण्यासाठी त्यांना ४५ मिनिटे लागली. त्यानंतर तो खोलीत गेला. जेवणाची ऑर्डर दिली, पण तीन तास ना अन्न ना पाणी मिळाले. अंकितने सांगितले की त्यांची मुलगी तीन वर्षांची आहे, त्यासाठी त्यांनी दुधाची ऑर्डर दिली, पण तेही त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही.हा व्हिडीओ समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :