प्रसिद्ध लेखक-गीतकार काळाच्या पडद्याआड..!

ओडिशातील प्रख्यात संगीतकार, (song writer) गायक, लेखक आणि गीतकार पद्मश्री प्रफुल्ल कर यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. भुवनेश्वर येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रफुल्ल कर यांच्या पार्थिवावर पुरी येथील स्वर्गद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी’पद्मश्री’ने सम्मानित प्रसिद्ध संगीतकार गायक प्रफुल्ल य़ांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.(song writer)
मोदीं यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, श्री प्रफुल्ल कर जी यांच्या निधनाने दु:ख झाले. ओडिया संस्कृती आणि संगीतातील त्यांच्या अग्रगण्य योगदानासाठी त्यांचे स्मरण केले जाईल. त्यांना बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभले आणि त्यांची सर्जनशीलता त्यांच्या कामातून दिसून आली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.
पीएम मोदी यांनी ओडिया भाषेतही एक ट्विट करून श्रद्धांजली वाहिली. प्रफुल्ल यांना २०१५ मध्ये पद्मश्रीने सन्मानित केले होते.
हेही वाचा :