मुलाच्या जन्मानंतर 12 दिवसांनी भारती सिंहने व्यक्त केली अशी इच्छा, चाहतेही हैराण

comedy queen

कॉमेडी क्वीन भारती सिंहने(comedy queen) काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला आहे. हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह सध्या पालक होणं एंजॉय करत आहेत.

दरम्यान मुलाच्या जन्मानंतर केवळ 12 दिवसांनी भारतीने कामाला सुरुवात देखील केली आहे. तिचे शूटिंगच्या सेटवरील व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भारती टॅलेंट हंट रिअॅलिटी शो ‘हुनरबाज: देश की शान’ च्या सेटवर दिसली. शोच्या शूटिंगपूर्वी आणि नंतरही भारती पापाराझींसह नेहमीप्रमाणेबोलतानाही दिसली.

आता भारती सिंहचा(comedy queen) आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या दुसऱ्या मुलाच्या प्लॅनिंगबद्दल बोलत आहे. या व्हिडीओमध्ये, पापाराझींशी संवाद साधताना भारतीने गंमतीत म्हणते आहे की तिच्या बेबी बॉयसाठी बहिण असावी याचं प्लॅनिंग करायला हवं. पोस्ट रॅप अप व्हिडिओमध्ये, भारती सिंह तिच्या दुसऱ्या मुलाच्या प्लॅनिंगबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी देखील तिचा विनोदी अंदाज पाहायला मिळाला.

Box Office वर धुमाकुळ करणाऱ्या या साउथ सुपरस्टार्सना पोलिसांनी फटकारलं! काय म्हणाली भारती सिंह? भारती सिंहचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. ज्यामध्ये पॅप्स भारतीला असं विचारत आहेत की, ‘भारतीजी एका बाळाची आई झाल्यानंतर आयुष्य किती बदलले आहे?’ ज्याचे उत्तर देताना कॉमेडी क्वीनने असे उत्तर दिले की, ‘असे मनात येत आहे की, आणखी एक बाळ व्हायला हवे.’

Smart News:-

पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण


‘मी त्यांच्याकडे पाहातच नाही !’, आदित्य ठाकरेंचा टोला


विद्यार्थ्यांनो, लवकरच जारी होणार ICSE परीक्षेचं हॉल तिकीट


राज ठाकरेंनी भोंग्यांऐवजी विकासाच्या मुद्दावर बोलाव; -भाजप उपाध्यक्ष


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *