‘मन सैराट झालं जी…’ रिंकूच्या जीवनात नव्या गोष्टीची एन्ट्री!

एका क्षणात जिने संपूर्ण महाराष्ट्राला ‘याडं लावलं…’ अशी अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू. आजही कोणत्याही कार्यक्रमात  ‘झिंगाट’ची जादू रंगते आणि प्रत्येकाला अर्चीची आठवण येते. ‘सैराट’ सिनेमाची जागा आजही कायम असताना रिंकू आता कोणत्या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार किंवा तिच्या खासगी आयुष्याबद्दल (private life) जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ‘सैराट’नंतर अन्य सिनेमे आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली रिंकू चाहत्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘सैराट’ फेम रिंकू आता ‘आठवा प्रेमाचा रंग’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात रिंकू कृतिका या भूमिकेत दिसणार आहे. खुशबू सिन्हा दिग्दर्शित सिनेमा 17 जून रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. सिनेमाच्या माध्यमातून रिंकूच्या जीवनात आणखी एका गोष्टीची एन्ट्री होत आहे, असं म्हणायला हरकत नाही.(private life)

खुद्द रिंकूने सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आह. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये ‘तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू… ‘कृतिका’च्या दमदार भूमिकेत येत आहे रिंकू राजगुरू. टीजर येत आहे सोमवारी, चुकवू नका!..’ असं लिहिलं आहे.

रिंकूच्या आतापर्यंतच्या सिनेमे आणि सीरिजबद्दल सांगायचं झालं तर, ‘सैराट’, ‘कागर’, ‘मेकअप’ या सिनेमांसोबत रिंकूच्या 200 हल्ला हो, अनपॉज्ड, १०० या वेब सीरिजना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता प्रेक्षकांच्या रिंकूच्या ‘आठवा प्रेमाचा रंग’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा :


राज्यावरील भारनियमनाचं संकट टळलं..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *