जेनेलिया दिसणार लवकरच ‘या’ अभिनेत्यासोबत..!

अत्यंत कमी कालावधीत लाखोंचा चाहतावर्ग निर्माण करणारी जेनेलिया डिसुझा  ही देशमुख झाल्यानंतर म्हणजेच लग्नानंतर चित्रपटातून फारशी दिसली नसली तरी तिचा चाहतावर्ग जरा देखील ओसरलेला नाही. जेनेलिया चित्रपट सृष्टीत (film creation) पुन्हा कधी पदार्पण करणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. अशीच कशीही आनंदवार्ता चित्रपटसृष्टीतून मिळत आहे.

जेनेलियाने लग्नाआधी अनेक चित्रपटात काम केले असून अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामे केली आहेत. लग्नानंतर तिने संसाराला प्राधान्य दिल्याने चित्रपटातून ती मागे हटली. पण तिचा एक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढे आहे. तो म्हणजे ‘जाने तू या जाने ना’. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तरुणांना अक्षरशः वेड लावले. या चित्रपटात अमीर यांचा भाचा इम्रान खान आणि जेनेलिया प्रमुख भूमिकेत होते.(film creation)

जेनेलियाला पुन्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याने तिने ‘वेड’  हा मराठी चित्रपट केला. या निमित्ताने तब्बल दहा वर्षांनी जेनेलिया ने चित्रपटात काम केले आहे. करोनमुळे का चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. परंतु लवकरच ती बॉलीवूड मध्येही धमाकेदार एंट्री घेणार असल्याचे समजते आहे.

हा चित्रपट म्हणजे ‘जाने तू या जाने ना’ चा सिक्वल आहे. या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची चर्चा सिनेजगतात आहे. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात जिनिलियाने ‘आदिती’ ही भूमिका साकारली होती. या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता पुन्हा हा चित्रपट येणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे तब्बल १५ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काय असेल, कथा कशी असेल, जेनेलियाचा लुक काय असेल याची चर्चा आता रंगत आहे. पण जेनेलिया सोबत प्रमुख भूमिकेत कोणता कलाकार असेल याची उत्सुकता अधिक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अमीर खान  प्रमुख भूमिकेत असणार आहे.’जाने तू या जाने ना’ या चित्रपटातील जेनेलियाचे काम पाहून अमीर खान अत्यंत प्रभावित झाला होता.म्हणूनच सिक्वल मध्ये दोघांनी एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. या संदर्भात काही आठवड्यांपूर्वीच एक खास बैठक पार पडली असून चित्रपटाला दोघांचाही होकार असल्याने बोलले जात आहे. या चित्रपटाची निर्मिती अमीर खान करणार असून त्यात कोणती आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :


PM मोदी यांचा विद्यार्थ्यांसाठी खास मंत्र..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *