अभिनेत्रीचा लेटेस्ट बोल्ड अंदाज सोशलवर तुफान व्हायरल..!

बॉलिवुडमध्ये 2019 तारा सुतारियाने “स्टूडेंट ऑफ द इयर-2′ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीजमध्ये (film industry) पाउल ठेवले होते. यात तिच्यासोबत टायर श्रॉफने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडेनेही डेब्यू केले होते.

ताराने (film industry) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी टेलिव्हिजनवर काम केले होते. आतापर्यत ती दोन चित्रपटात झळकलेली आहे. “स्टुडेंट ऑफ द इयर’नंतर तिने “मरजावा’ चित्रपटात एका मुक मुलीची भूमिका साकारली होती.

बॉलिवुडमधील सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्यांमध्ये तारा सुतारियाचे नाव आघाडीवर आहे. ती नेहमीच तिच्या फोटो शूटमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच ताराने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यांची खूप चर्चा होत आहे. ताराने या फोटोशूटमध्ये लाल लेदर स्कर्टसह चमकदार लाल कॉर्सेट आऊटफिट परिधान केले आहे. यामध्ये ती बॉस लेडी दिसून येत आहे. या फोटोशूटला तिने कॅप्शन दिले आहे की,’“#हीरोपंती2 च्या पहिला फोटोशूट.” तिच्या या फोटोशूटवर प्रेक्षकांकडून लाईकचा वर्षाव होत आहे.

“हीरोपंती-2’मध्ये टायगर श्रॉफ मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत तारा सुतारिया आणि नवाजुद्‌दीन सिद्दीकीदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरण करणार सुरुवात झाली आहे हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी ईदच्या दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

हेही वाचा :


धक्कादायक! आईचे पेन्शन मिळावे म्हणून तरुणीचे विकृत कृत्य..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *