जितेंद्र जोशीची सई ताम्हणकरच्या B.E Rojgaar साठी खास पोस्ट..!

मराठी मनोरंजनसृष्टीत (film industry) सध्या एकापेक्षा एक कलाकृती पाहायला मिळत आहेत. या कलाकृती फक्त प्रेक्षकांनाच नव्हे तर सेलेब्रेटींना देखील भुरळ घालत आहेत. नुकतंच रिलीज झालेल्या ‘BE. Rojgaar’ या सीरिजने अभिनेता जितेंद्र जोशीचंसुद्धा मन जिंकलं आहे. या अभिनेत्याने एक लांबलचक पोस्ट लिहत या सीरिजचं कौतुक केलं आहे.

जितेंद्र जोशी हा मराठीतील एक उत्तम अभिनेता, होस्ट आणि कवी तर आहेच शिवाय आता तो एक उत्कृष्ट निर्मातादेखील बनला आहे. काही महिन्यांपूर्वीच जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’  या चित्रपटाची ऑस्कर नामांकनासाठी निवड झाली होती. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला होता.

त्यांनतर या चित्रपटाने मराठी (film industry) सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला होता. ऑस्करनंतर कान्स महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड झाली होती. त्यांनतर आता जितेंद्र जोशीने आपल्या सहकलाकार मित्रांच्या न्यू रिलीज सीरिजचं तोंडभरुन कौतुक करत म्हटलंय ‘त्याला जबरदस्त मालमसाला लावून देखील विकता येणं शक्य होतं पण तसं न करता मायेनं, समजुतीनं आणि निगुतीनं त्याने हा अनुभव मांडला आहे’. पाहूया त्याने पोस्टमध्ये नेमकं काय लिहलंय.

जितेंद्र जोशी पोस्ट-

त्वेष आहे पण द्वेष नाही….ऊर्जा आहे पण उन्माद नाही

3 इंजिनियर मित्रांच्या या गोष्टीमध्ये संघर्ष आहे, प्रेम आहे, भांडणं आहेत पण हेवेदावे नाहीत. आजकालच्या बऱ्याच कलाकृतींमध्ये नाट्या च्या नावाखाली जे जे दिसतं ते याच्यात अजिबात नाही परंतु बऱ्याच दिवसात दिसला नाही असा निखळपणा घेऊन आली आहे ही मालिका..सारंग साठ्ये या माझ्या मित्राने दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत जितक्या गोष्टी दिसल्या त्या सर्व गोष्टी त्याने स्वतः भोगलेल्या, सोसलेल्या, पाहिलेल्या आणि खऱ्या अर्थाने अनुभवलेल्या आहेत. स्वतःच्या आणि आसपासच्या जगण्यातून जो अनुभव मिळाला तो तासाच्या तसा सारंग ने मांडला.

त्याला जबरदस्त मालमसाला लावून देखील विकता येणं शक्य होतं पण तसं न करता मायेनं, समजुतीनं आणि निगुतीनं त्याने हा अनुभव मांडला आहे. संपूर्ण मालिका पाहताना या 3 मित्रांविषयी आणि त्यांच्या परिवारा विषयी एक जिव्हाळा तयार होतो. त्यांची गोष्ट आपली बनून जाते आणि आपण त्यात आपसूक ओढले जाऊन त्यांच्या सोबत गावातल्या मातीत जातो. “कळप सोड, बांध तोड, दगड दिला लेणी कोर.. मातीत जा गाडून घे” या ओळी फक्त गाण्यापुरत्या मर्यादित रहात नाहीत तर त्या कृतीमध्ये बदलतात. ही मालिका आशा निर्माण करते. आजच्या मुलांविषयी खरं बोलतो. (film industry) वेगळं काहीतरी करू धजावणाऱ्या मुलांच्या पालकांना नेहमीप्रमाणे सरधोपट वाईट न दाखवता पालकांमधली काळजी, प्रेम, वेडेपणा, समजूत दाखवते. मनोरंजन करताना आपण काय पोहोचवतो आहोत याचं भान असणाऱ्या कलाकारांची कलाकृती वाट दाखवते आणि वाटाड्या बनते.

हेही वाचा :


बंडखोर आमदार गुवाहाटीत, मीम्सचा ‘पाऊस’ महाराष्ट्रात…

Leave a Reply

Your email address will not be published.