‘टीव्ही इंडस्ट्रीत काय चालतं?’

टीव्ही मनोरंजन (film industry) विश्वामध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांमध्ये अमाप लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणून अदा खानचं नाव (Adaa Khan) टॉपला आहे. नागिन (Naggin Actress) या मालिकेची प्रमुख अभिनेत्री यामुळे अदा आता घराघरात पोहचली आहे. एकता कपूरच्या (Ekta kapoor serial) नागिन मालिकेतूनव अदाला मोठा ब्रेक मिळाला आणि तिची गाडी सुसाट सुटल्याचे दिसून आले आहे. टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये काही वर्ष गेल्यानंतर तिनं त्या क्षेत्राविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अदा काय म्हणाली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
कुणीही नव्यानं टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आल्यास त्याचा प्रवास काही सोपा नसतो. खासकरुन अभिनेत्रींनी तर मोठ्या बिकट प्रसंगांना सामोर जावं लागतं. यासगळ्या प्रकारावरुन अदा खाननं टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये काय चालते याचा धक्कादायक खुलासा केला आहे. आता अनेक कलाकारांना त्यांच्यातील टॅलेंटमुळे काम मिळत नाही तर त्यांना सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहे, त्याचा त्या माध्यमावर किती प्रभाव आहे यावरुन त्यांना रोल दिले जात असल्याचे अदानं म्हटले आहे. आपल्यात अभिनयाचे किती गुण आहेत यावरुन काम दिले जात नाही ही मोठी खंत आहे. सध्या हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.(film industry)
View this post on Instagram
यासगळ्याचा परिणाम जे नवोदित कलाकार आहेत त्यांच्यावर होतो आहे. ते मोठ्या अपेक्षेनं टीव्ही मनोरंजन क्षेत्राकडे येतात. पण असं काही ऐकल्यावर आणि पाहिल्यावर त्यांची निराशा झाल्याशिवाय राहत नाही. मनोरंजन क्षेत्रामध्ये आणखी खूप काही गोष्टी घडत असतात. मात्र सगळ्यांचेच हात दगडाखाली अडकल्यानं कोण नाही बोलण्याचे धाडस करत नाही. जो कुणी काही सांगण्याचे धाडस करतो त्याच्याबाबत काय होते हे आपण पाहिलं आहे. त्याचा अनुभवही काही सेलिब्रेटींनी घेतला आहे. आउटलूक या मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अदानं मनोरंजन विश्वातील अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे.
हेही वाचा :