आता गंगुबाई येणार ओटीटीवर, जाणून घ्या रिलिज डेट

कोरोनाच्या काळात दोन वर्षांपासून प्रदर्शनाची तारीख तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला (Entertainment News) होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.आलिया भट्टची प्रमुख भूमिका (Alia Bhatt) असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ( ott platform) विक्रमी कमाई केली आहे.
आता गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित ( ott platform) होणार असल्याचे निर्मात्यांच्या वतीनं सांगण्यात आले आहे. संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मनं रिलिज डेट देखील डिक्लेअर केली आहे. आपण त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आता निर्मात्यांनी ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
जेव्हा कोरोनाची लाट होती तेव्हा अनेक चित्रपटांचा प्रिमिअर हा ओटीटीवरुनच प्रदर्शित झाला होता. गंगुबाईच्या वेळी मात्र कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्यानं निर्मांत्यांना दिलासा मिळाला होता.
आता नेटफ्लिक्सनं पुढील महिन्यात हा चित्रपट ओटीटीवरुन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 फेब्रुवारीला गंगुबाई काठियावाड हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो ओटीटीवर 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनापूर्वी साधारण असा एक नियम होता की, चित्रपटानं आठ आठवडे पूर्ण केल्यानंतर तो ओटीटी वर प्रदर्शित करता येईल. त्यानंतर शादी में जरुर आना, 1921 सारखे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले होते. मात्र थिएटरमध्ये त्यांना निर्मात्यांनी प्रदर्शित करण्यास नकार दिला होता.
हेही वाचा :