Gully Boy फेम रॅपरचा धक्कादायक मृत्यू

rapper

रॅप म्युझिकच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी आहे. रॅपर धर्मेश परमार (rapper Dharmesh Parmar Died) याचे वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी निधन झाले आहे. अशी माहिती मिळते आहे की रॅपर धर्मेशन एका कार अपघातात जीव गमावला आहे. स्ट्रीट रॅपर कम्युनिटीमध्ये धर्मेश प्रसिद्ध होता, एमसी तोडफोड (MC TodFod) या नावाने तो प्रसिद्ध होता. त्याच्या गुजराती रॅपमुळे तो नावारुपास आला होता.

काही वर्षांपूर्वी आलेला रणवीर सिंगचा सुपरहिट सिनेमा ‘गली बॉय’मध्ये धर्मेशने एका ट्रॅकसाठी रॅप साँग गायलं होतं. त्याचप्रमाणे हा प्रसिद्ध एमसी तोडफोड स्वदेसी (Swadesi Band) नावाच्या एका हिप-हॉप बँडचा भाग होता. या बँडने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. दरम्यान त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत त्याच्या बँडकडून किंवा कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आज 21 मार्च रोजी सोमवारी या रॅपरवर (rapper) अत्यंसंस्कार होणार आहेत. याबाबतची माहिती एमसी तोडफोडचा बँड स्वदेसीने दिली आहे. त्यांनी धर्मेशला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी धर्मेशच्या शेवटच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘स्वदेसी मेला’मध्ये धर्मेशने शेवटचा परफॉर्मन्स दिला होता. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘तू कधी विसरला जाणार नाहीस, तू तुझ्या संगीतातून नेहमी जिवंत राहशील.’

यावेळी त्यांनी धर्मेशच्या रॅपमधील काही ओळी देखील पोस्ट केल्या आहेत. या ओळी अशा आहेत- कभी सोचू कही चले जाने की दूर, कोई ठिकाने बस जाऊ जो ना ज्यादा मशहूर, जहाँ ले जाती रहे मन को भाए वो मैं करू, ऐसे जीना रहना किया मैंने यही से शुरू..’

‘स्वदेसी’च्या या पोस्टवर रॅपिंग म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी कमेंट्स केल्या आहेत. शिवाय त्याच्या चाहत्यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि रॅपर रफ्तार याने देखील MC TodFod आपल्यातून लवकर निघून गेल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याचा एक अल्बम ‘ट्रूथ अँड बास’ देखील अलीकडेच 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. त्याने काही आंतरराष्ट्रीय परफॉर्मन्सही दिले आहेत.


हेही वाचा :


आयपीएल चाहत्यांना देणार पुन्हा मोठा धक्का!


तुम्ही भाडेकरू आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची..!


भन्नाट प्लान! फक्त ७५ रुपयात मिळेल २८ दिवसांची वैधता..!


भयंकर! सलमान खान करणार होता आत्महत्या; या आजारानं होता त्रस्त!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *