अभिनेत्रीचा हैराण करणारा लूक, व्हिडिओ व्हायरल..!

Urfi Javed new look fashion

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद एकापेक्षा एक लूकने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला काही मिनिटंच लागतात. आता पुन्हा एकदा उर्फीचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी तिचा लेटेस्ट लूक फ्लॉंट (new look fashion) करताना दिसत आहे.

उर्फी जावेदचा लेटेस्ट व्हिडिओ
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद बॅकलेस स्टाईलमध्ये आपल्या रेशमी केसांसोबत खेळताना दिसत आहे. खरंतर, अलीकडेच उर्फीने नवा लूक (new look fashion) कॅरी केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘ओळखा पाहू कोण’.

Urfi Javed new look fashion

उर्फीने व्हिडिओमध्ये तिचा चेहरा दाखवला नसला तरी फॅशन आणि स्टाइल पाहून चाहते तिला ओळखायला मिनिटही घेत नाहीयेत. अवघ्या तासाभरात उर्फीच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. उर्फीच्या या बिंधास्त स्टाईलचं चाहते कौतुक करत आहेत.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर उर्फीने तिच्या करिअरची सुरुवात हिंदी टीव्ही मालिकांमधून केली. अभिनेत्रीने 2016 मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ ही मालिका केली होती. यानंतर उर्फीने अनेक मालिकांमध्ये काम केलं, या अभिनेत्रीने बिग बॉस ओटीटीमधून खूप लोकप्रियता मिळवली. उर्फी जावेदला इंस्टा रील बनवण्याची खूप आवड आहे. ट्रेंडिंग गाण्यांवर ती डान्स करताना व्हिडिओ बनवताना दिसते.

हेही वाचा :


मुंबईच्या ‘पलटण’मध्ये घातक बॉलरची एन्ट्री..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *