HDFC चे 100 ग्राहक झाले अचानक मालामाल, खात्यात आले 13 कोटी

HDFC Bank

एचडीएफसी बँकेकडून (HDFC Bank)त्यांच्या 100 हून जास्त खातेदारांना एका दिवसांत चांगलेच मालामाल केले. रविवारी या सगळ्यांच्या खात्यात 13-13 कोटी टाकण्यात आले होते. एवढा मोठा आकडा आपल्या बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे पाहून खातेदारही चक्रावले. एवढे पैसे खात्यात जमा झाले असे असा प्रश्नही अनेकांना पडला. मात्र खातेदारांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. देशातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेकडून झालेल्या चुकीची चर्चा मात्र आता सगळीकडे रंगली आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर या खातेदारांवर मात्र काही बंधने आणण्यात आली आहेत.

नेमका काय घडला प्रकार ?

चैन्नईच्या के टी नगरमधील एचडीएफसी बँकेत(HDFC Bank) खाती असलेल्या 100 ग्रहकांना रविवारी एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये तुमच्या खात्यात 13 कोटी रुपये जमा झाले आहेत, असे लिहिण्यात आले होते. 100 ग्राहकांना हा मेसेज गेला. म्हणजे 1300 कोटी रुपयांचे मेसेज ग्राहकांना पाठवण्यात आले होते. इतकी मोठी रक्कम खात्यात आल्यानंतर, ती आली कुठून असा प्रश्न अनेकांना पडला. अनेकांनी घाबरुन पोलिसांना ही माहिती दिली. आपले बँक अकाऊंट हॅक तर झाले नाही ना, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली.

पोलिसांनी बँकेशी संपर्क साधल्यावर कळाले कारण

त्यानंतर पोलिसांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेत बँकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला. त्यावेळी या सगळ्या प्रकरणाचा इलगडा झाला. एका तांत्रिक चुकीमुळे सगळ्यांना 13 कोटी जमा झाल्याचे मेसेज गेल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्रँच ऑफिसमध्ये सॉफ्टवे्र प२चची प्रक्रिया सुरु होती, त्यात समस्या आली. त्यामुळे हे मेसेज गेल्याचे सांगण्यात आले. एचडीएफसीच्या केवळ एकाच बँकेच्या शाखेतील काही खातेदारांना हे मेसेज गेले होते.

फक्त मेसेजच होता, पैसे जमा नव्हते

केवळ तांत्रिक कारणामुळे हे घडले होते, असे एचडीएफसी बँकेच्या(HDFC Bank) सूत्रांनी स्पष्ट केले. कशलाही प्रकारचे हॅकिंग झालेले नव्हते आणि 100 खात्यांत 13-13कोटी जमाही झालेले नव्हते हेही स्पष्ट करण्यात आले. तांत्रिक अडचणींमुळे केवळ मेसेज गेल्याचे सांगण्यात आले आहे.

या खातेदारांना पैसे काढण्यास बंदी

याची प्रकाराची माहिती बँकेला मिळताच तत्काळ या खात्यांतून पैसे काढण्यास बंदी करण्यात आली. ही तांत्रिक समस्या सुटत नाही तोपर्यंत या खात्यांत फक्त पैसे जमा करता येतील, काढता येणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. या समस्येतील 80 टक्के दुरुस्ती रविवारीच करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता आयटी रिटर्न भरताना होणाऱ्या त्रासाचे काय, असा प्रश्न ग्राहकांनी विचारल्यानंतर त्याच्यावरही तोडगा काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Smart News:-

नाशिक जिल्‍ह्यात ‘रोहयो’ अंतर्गत २२ हजार मजुरांच्या हाताला काम


गायक सिद्धू मूसेवाल हत्ये प्रकरणी 6 जणांना पंजब पोलीसांच्या ताब्यात


सैन्यातील अधिकाऱ्यावरच जातपंचायतीचा बहिष्कार, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार


मुंबई : सीजन हॉटेलमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा कुजलेला मृतदेह


Leave a Reply

Your email address will not be published.