“बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले”; पहा अभिनेत्री काय म्हणते…
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट (movies)पाहिल्यानंतर बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौत हिने कौतुकाचा वर्षाव केला आहे. “द काश्मीर फाईल्सने बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले”, असं ती म्हणाली. यावेळी तिने इंडस्ट्रीतल्या इतर कलाकारांनाही टोला लगावला. “उंदरासारखं बिळात लपून बसलेल्यांनी बाहेर यावं आणि या चित्रपटाचं प्रमोशन करावं”, अशा शब्दांत तिने बॉलिवूडकरांना टोमणा मारला आहे.
कंगनाच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. या चित्रपटात अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यांसह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.
काय म्हणाली कंगना?
“द काश्मीर फाईल्सच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पाप होते, ते सर्व पाप धुवून टाकले आहेत. बॉलिवूडचेही पाप त्यांनी धुवून टाकले. हा चित्रपट (movies) इतका कौतुकास्पद आहे की जे इंडस्ट्रीवाले आपल्या बिळात लपून बसले आहेत, त्यांनी बाहेर येऊन याचं प्रमोशन केलं पाहिजे. नेहमी ते बकवास, सडलेल्या चित्रपटांचं प्रमोशन करतात”, असं ती म्हणाली. ‘द काश्मीर फाईल्स’बद्दल कंगनाने पहिल्यांदाच वक्तव्य केलेलं नाही. याआधीही तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती.
मोदींकडूनही चित्रपटाची प्रशंसा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ‘द काश्मीर फाईल्स’चं कौतुक केलं. “हा खूप चांगला चित्रपट असून असे चित्रपट आणखी व्हायला हवेत,” असं ते म्हणाले. “अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळतं आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना कोण जबाबदार होते हेदेखील समजतं. कोणी शोषण केलं किंवा कोणी चांगलं काम केलं हे सांगण्याचा प्रयत्न यांसारखे चित्रपट करतात. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता चित्रपटाला विरोध करत आहेत, असंदेखील ते म्हणाले.
हेही वाचा :