हिमेश रेशमियाचा भर एअरपोर्टवर झाला पोपट…

himesh reshammiya video go viral

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया त्याच्या गाण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे, पण यावेळी हिमेश त्याच्या कोणत्याही म्युझिक व्हिडिओमुळे नाही तर त्याच्या एका स्पॉट केलेल्या व्हिडिओमुळे (go viral) चर्चेत आहे.

अलीकडेच हिमेश रेशमिया पत्नी सोनिया कपूरसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. यादरम्यान हिमेशने पापाराझींना पोज देताना केलेली कृती कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता यासाठी हिमेशला सोशल मीडियावर ट्रोल (go viral) केले जात आहे.

एअरपोर्टवर हिमेश आणि सोनियाला पापाराझींनी फोटोसाठी थांबवलं आणि त्यांना पोज देण्याची विनंती केली. पत्नीपेक्षा उंचीने कमी असलेला हिमेश सोनियाच्या बरोबरीचा दिसण्यासाठी पायाच्या बोट्यांवर उभा राहिला.

हिमेशच्या या कृतीवरुन त्याची खूप खिल्ली उडवली जात आहे. पत्नीच्या बाजूला उभं राहण्यासाठी हिमेश घाबरतो अशी चर्चा ही सुरु झाली आहे. कारण तो पोज देताना सुद्धा काहीसा बावरल्याचं बोललं जात आहे. हिमेशच्या या व्हिडिओनंतर हिमेश रेशमिया भर एअरपोर्टवर पत्नीची बरोबरी करायला गेला आणि त्याचा पोपट झाला असं बोललं जात आहे.


हेही वाचा :


निया गांधींच्या नेतृत्वात आज काँग्रेसची बैठक…


सतेज पाटील चंद्रकांत पाटलांची काढणार समजूत ?


पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *