हिना खानच्या बॅकलेस ड्रेसनं लुटलं कान्स…

अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त (backless dress) लूकमुळे चर्चेत आहे. कान्स २०२२ मध्ये हिना खानने पुन्हा एकदा तिच्या स्टाईल स्टेटमेंटने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. ऑफ शोल्डर गाउनमध्ये हिनाने कान्सच्या रेड कार्पेटवर धुमाकूळ घातला आहे.
रेड कार्पेटवर क्वीन हिना खानचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते ‘व्वा’ केल्याशिवाय राहू शकत नाहीत. हिना खानने ऑफ शोल्डर पेप्लम व्हॉल्युमिनस फेदर गाऊन (backless dress) परिधान केला होता. हिना खानला या थाय हाय स्लिट सिल्हूट गाऊनमध्ये पाहून तिच्याकडे बघतच राहिले.
हिना खानचा हा सुंदर गाऊन सोफीच्या कॉउचरचा होता. हिनाने सिल्व्हर पेन्सिल हील्स, डायमंड बेसाल्ट, डायमंड इअररिंग्ससह लूक पूर्ण केला. साईड पार्ट केलेल्या हलक्या लहरी केसांमधील हिना खानच्या लूकचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
फिकट जांभळा आयशॅडो, न्यूड लिपस्टिक, मस्करा, ग्लॉसी मेकअपसह हिना खानने तिच्या लूकमध्ये भर घातली. हिनाच्या लूकचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हिना खानने २०१९ मध्ये कान्समध्ये पदार्पण केले. तिने कान्सच्या रेड कार्पेटवर जेव्हा-जेव्हा वॉक केला आहे, तेव्हा तिने आपल्या स्टाईलने फॅशन एका उंचीवर नेले आहे.
हिनाच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिनाने रेड कार्पेटवर एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. हिनाने ज्या प्रकारे तिचा लूक कॅरी केला आहे तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक होत आहे. हिनाने तिच्या लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
हिना खान तिच्या इंडो इंग्लिश चित्रपट कंट्री ऑफ द ब्लाइंडचे पोस्टर लाँच करण्यासाठी कान्स येथे पोहोचली आहे. राहत काझमी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हिनाने दुसऱ्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. याआधी, हिनाने तिच्या पदार्पणाच्या वर्षातही फॅशन बार सेट करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती.
हेही वाचा :