‘तारक मेहता’ मधून आता हॉट ‘बबिता’ घेणार एक्झिट?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (tarak mehta show) ही मालिका प्रेक्षकांमध्ये सर्वात अधिक प्रसिद्ध असून गेली अनेक वर्ष या मालिकेतील कलाकारही घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरले आहे. पण गेल्या काही दिवसांत या मालिकेसंदर्भात चाहत्यांना नाराज करणाऱ्या अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. काही दिवसांपूर्वी तारक मेहता ही महत्त्वाची भूमिका करणारे शैलेश लोढा मालिकेतून एक्झिट घेत आहेत ही बातमी सर्वत्र पसरली असताना आता चाहत्यांमध्ये हॉट बबिता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता या मालिकेला रामराम ठोकत आहे अशी बातमी देखील कानावर पडली आहे.
‘तारक मेहता..’ शो (tarak mehta show) मध्ये मुनमुन दत्तानं साकारलेली बबिताची भूमिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुनमुन दत्ताला देखील बबिता या व्यक्तिरेखेमुळे अधिक ओळख मिळाली आहे. आणि अशामध्ये ती मालिकेतून बाहर पडत आहे असं कळलं तर नक्कीच चाहते नाराज होतील.
मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार मुनमुन दत्ताच्या प्रसिद्धिला पाहता बीग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनसाठी तिच्याशी संपर्क साधला गेल्याचं कळत आहे. त्यामुळे आता दावा केला जात आहे की जर मुनमुन दत्ता बिग बॉस ओटीटी मध्ये समिल होण्यासाठी होकार कळवते तर नक्कीच ती छोट्या पडद्यावरच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेला गूडबाय म्हणू शकते. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती कळालेली नाही.
‘बिग बॉस’ शो चे आपण चाहते असाल तर नक्कीच आपण सर्वांनी ‘बिग बॉस 15’ मध्ये तिला पाहिलं असेल. या सीझनमध्ये बबिता दोन दिवसासाठी चॅलेंजर म्हणून शो मध्ये गेली होती. तिच्यासोबत नागिन सुरभी चंदन,आकांक्षा पुरी आणि विशाल पुरी ने देखील एन्ट्री घेतला होती. या सगळ्यांनी बिग बॉस शो मध्ये गेल्यावर कंटेस्टंट्सना खूप कठीण टास्क दिले होते.
बिग बॉसच्या घरातील दोन दिवसांच्या वास्तव्यात मुनमुन दत्तानं आपली चांगलीच छाप सोडली होती. आणि असं असताना जर का ती बिग बॉस ओटीटी मध्ये सामिल झाली तर ती या सिझनमध्ये धमाल आणेल यात शंकाच नाही. आता चाहते म्हणून आपल्या हातात फक्त एवढंच राहिल की मुनमुन दत्ता ‘बिग बॉस ओटीटी’ की ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, यापैकी कोणत्या शो ला प्राधान्य देते या तिच्या निर्णयावर लक्ष ठेवायचं.
हेही वाचा :