स्वत:च्याच नवऱ्याला कशी मारते बघा (video); ‘डार्लिंग्स’चा ट्रेलर रिलीज’

गंगुबाई काठियावाडी (gangubai kathiawadi) फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट  आगामी ‘डार्लिंग्स’  या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा सध्या धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आलिया तिच्या पतीच्या अत्याचाराच्या विरूदध आवाज उठवताना दिसतेय. आलियाच्या पतीच्या भूमिकेत अभिनेता विजय वर्मा आहे.

आलियाचा ‘डार्लिंग्स’  चित्रपटाच्या २ मिनिटे ३४ सेंकदांचा ट्रेलर नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरची सुरुवात आलिया भट्टच्या (gangubai kathiawadi) पतीची भूमिका साकारणाऱ्या विजय वर्माच्या डायलॉग्सने होते. यात विजयचे आलियावर खूपच प्रेम असल्याचे पहिल्यांदा दाखवण्यात आलं आहे. यानंतर विजय कामानिमित्ताने तिला एकटीला सोडून बाहेरगावी जात असल्याचे सांगतो आणि त्याचे अपहरण होते. ही गोष्ट आलियाला समजताच ती धावत- पळत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जाते.

परंतु, या घटनेचा तपास पोलिसांनी केल्यानंतर विजयचे अपहरण दुसरे- तिसरे कोणी न करता त्याच्या स्वत: च्याच पत्नी म्हणजे, आलियाने केल्याचे समजते. ही गुप्त माहिती समोर येताच घटनेचा उलगडा होतो. याच दरम्यान आलियासोबत तिची आई आणि आणखी एक व्यक्ती दिसतेय. तर विजयचा बदला घेण्यासाठी आलिया असे वागत असल्याचे निदर्शनास येत आहे.

‘डार्लिंग्स’ या चित्रपटाची कथा खूपच रंजक असून आलियाचा अभिनय जबरदस्त आहे. या चित्रपटात आलिया भट्ट- विजय वर्मासोबत शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यू दिसणार आहेत. हा चित्रपट आलिया भट्टचे प्रोडक्शन हाऊस इंटरनल सनशाइन आणि शाहरुख खानचे रेड चिलीज एंटरटेनमेन्ट प्रोडक्शन हाऊस यांनी संयुक्तपणे बनविला आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Smart News :


तलावात पोहताना तलाठ्याचा बुडून मृत्यू !

Leave a Reply

Your email address will not be published.