मालिका सोडण्याबाबत हृता दुर्गुळेचे मोठे विधान!

दुर्वा, फुलपाखरु या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. नवनवीन मालिका, नाटक आणि चित्रपट आणि तिन्ही माध्यमातून ती झळकत आहे. सध्या तिची झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ (man udu udu zal) ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरते आहे. या मालिकेतू इंद्रा आणि दिपूची लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या मालिकेतून हृता दीपाची भूमिका साकारत आहे. पण हृताने ही मालिका सोडल्याच्या चर्चेचा उधाण आले होते. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला. अखेर यावर आता हृतानेच स्पष्टीकरण दिले आहे.

हृता दुर्गुळे मालिका (man udu udu zal) सोडत असल्याची बातमी व्हायरल होताच अनेक चर्चांना तोंड फुटले. तीने ही मालिका का सोडली? तिचे काही खटकले का? काही वाद झाले का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र नुकतंच या सर्व चर्चांवर हृताने महत्वाचं विधान केलं आहे, ‘मी ही मालिका सोडलेली नाही’, असे तिने एका मुलाखतीदरम्यान म्हटले.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडलेली नाही. या केवळ अफवा आहेत. सध्या मी या मालिकेचे शूटिंग करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी तसेच चाहत्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका”, अशी विनंती तिने केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)


काय होती चर्चा…

मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसल्याने ऋता (hruta durgule) आणि निर्मात्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. हा वाद विकोपाला गेल्यानंतर हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. तसेच नाटकांच्या प्रयोगामुळे आणि ‘अनन्या’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड व्यस्त आहे. शिवाय तिच्या लग्नाची तारीखही जवळ आली आहे. त्यामुळे ती ही मालिका सोडत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र हृताच्या उत्तराने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा :


बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत केली होती या पक्षांची युती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *