‘अजूनही मला विचारलं तर मी बिग बॉस मराठी 4 होस्ट करायला तयार आहे’, महेश मांजरेकरांचा खुलासा

Bigg Boss Marathi

हिंदी प्रमाणेच बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi) हा देखील छोट्या पडद्यावरील खूप लोकप्रिय शो आहे. आतापर्यंत बिग बॉस मराठी शोचे तीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

प्रत्येक सिझनला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. या घरात स्पर्धकांमध्ये खेळले जाणारे खेळ, त्यांच्यातील वादविवाद हे सर्व पहायला प्रेक्षकांना आवडतं. लवकरच या शोचा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बाॅस मराठी(Bigg Boss Marathi) पर्व ४’ चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर नसणार आहेत हे आता स्पष्टच झाले आहे.

त्याच्या कारणांविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता खुद्द महेश मांजरेकरांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या पर्वांची यशस्वी सूत्रसंचालन त्यांनी केलेले आहे . मात्र आता ते दिसणार नसल्याने चाहत्यांची निराशा झाली होती.

पण आता नवीन होस्ट कोण दिसणार याविषयी सध्या संभ्रम आहे. महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत ते बिग बॉसचे सूत्रसंचालन का करणार नाहीत याचे कारण आता स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितलं कि, ‘माझं तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. ते तीन वर्ष मी मन लावून हा शो होस्ट केला.’ पुढे ते म्हणाले, ‘अजूनही मला विचारलं तर मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करायला तयार आहे.

पण मी आता बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi) चौथ्या सीझनसाठी बांधील नाहीये.’ पुढे त्यांनी असाही स्पष्ट केलं कि, ‘मला विचारलं तर मी पूर्ण मेहनतीने शो होस्ट करेन. पण मी नाही केलं तरी माझी नाराजी असणार नाही. मी तेवढ्याच आनंदाने तो कार्यक्रम बघेल. ‘Smart News:-

मंकीपॉक्‍सचा वाढता प्रादुर्भाव : अमेरिकेने घेतला ‘मोठा’ निर्णय


पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे 14 रुग्ण; तीन वर्षांनंतर आढळले रुग्ण


डेड बॉडी सडत होती, तरीही FTII प्रशासनाला कळलं कसं नाही?


CM ममता बॅनर्जींनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; पंतप्रधानांकडे केली 1 लाख कोटींची मागणी


उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन; आणखी दोघांना अटक, NIA ला मोठं यश


 

Leave a Reply

Your email address will not be published.