‘मला प्रोड्युसरच्या पैशांची गरज नाही’; कपिल शर्मावर भडकली अर्चना पूरण सिंग

Celebrity Archana Puran Singh

विविध फंडे, जोक्स वापरुन प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा रिअॅलिटी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या कार्यक्रमाच्या मंचावर आजवर अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली आहे. त्यामुळे चित्रपटांच्या प्रमोशनसोबतच कपिल त्याच्या टीमसह प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. यात अनेकदा त्याचे काही विनोद अभिनेत्री आणि या शोची जज अर्चना पूरण सिंग(Celebrity Archana Puran Singh) हिच्यावरच असतात. अनेकदा या शोमध्ये तिची खिल्लीही उडवली जाते. मात्र, यावेळी अर्चनाची खिल्ली उडवणं कपिलला महागात पडलं आहे.

येत्या काही दिवसांमध्ये कपिल शर्माची संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या विनोदांमध्ये या दौऱ्याविषयी भाष्य केलं जातं. यामध्येच आता कपिलने प्रेक्षकांना हसवण्यासाठी अर्चना पूरण सिंगवर जोक केला. मात्र, भर कार्यक्रमात अर्चनाने देखील कपिलला प्रत्युत्तर देत तिची नाराजगी व्यक्त केली आहे.

आमची सगळी टीम अमेरिकेला जाणार आहे. मात्र, अर्चना पूरण सिंग(Celebrity Archana Puran Singh) शिवायच आम्ही रवाना होणार आहोत, असं कपिल म्हणतो. त्यावर मी स्वत:च्या कमाईच्या पैशातून तिकीट घेऊन येऊ शकते. मला प्रोड्युसर वा स्पॉन्सरने दिलेल्या पैशांवर जाण्याची गरज नाही, असं थेट उत्तर अर्चनाने दिलं.

दरम्यान, अर्चनाच्या या उत्तरावरुन तिला राग आल्याचं स्पष्ट जाणवत होतं. कपिल आणि अर्चना यांच्यात झालेल्या या शाब्दिक चकमकीच्या वेळी या मंचावर गुरु रंधावा, हनी सिंग आणि दिव्या खोसला कुमार यांनी हजेरी लावली होती.

Smart News:-

मुलांना रस्त्यावर थांबवून शिक्षकाने झाडाला घेतला गळफास


ग्रीन टीचे फायदे: चहाच्या जागी ग्रीन टी वापरून पहा, शरीर आणि मन दोघांनाही होतील आश्चर्यकारक फायदे


अभिनेत्री बिदिशा डेचं निधन; गळफास घेत केली आत्महत्या!


जागतिक बँकेच्या प्रमुखांनी व्यक्त केली मंदीची भीती!


Leave a Reply

Your email address will not be published.