‘मी आलो नाही तर तुमची…’, शालेय विद्यार्थ्याचं Funny Leave Application वाचून पोट धरून हसाल

शाळेत सुट्टी हवी तर एक सुट्टीचा अर्ज द्यायला लागतो हे तुम्हाला माहितीच असेल. हा सुट्टीचा अर्ज लिहिणंही म्हणजेही एक कौशल्यच. अशाच एका शालेय विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मीडियावर(Social media) व्हायरल होतो आहे.
आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा अर्ज पोस्ट केला आहे. हा अर्ज वाचल्यानंतर त्याच्या शिक्षकांनीही त्याला तातडीने सुट्टी मंजूर केली असावी. असंच तुम्हीही म्हणाल. असं या विद्यार्थ्याने या अर्जात काय लिहिलं आहे ते पाहुया.
हेचिमुकल्यांचं एक छोटंसं पाऊल, वाचला कित्येक लोकांचा जीव; Must बुंदेलखंडी बोलीत खूप मजेशीर असा हा अर्ज आहे. या सुट्टीच्या अर्जात म्हटलं आहे. आदरणीय मुख्याध्यापक, माध्यमिक पाठशाळा बुंदेलखंड. मास्तर…दोन ते चार दिवस मी शाळेत येणार नाही आहे.
मला ताप आला आहे, नाकही वाहत आहे. त्यामुळे मी शाळेत येऊ शकत नाही. तुम्हाला विनंती आहे की मला मला दोन-चार दिवसांची सुट्टी दिली तर बरं होईल. मी नाही आल्याने तुमची शाळा कुठे बंद होणार आहे.
तुमचा…आज्ञाधारी विद्यार्थी…कलुआ.
छुट्टी के लिए आवेदन पत्र! 😂😂 pic.twitter.com/RVgTX5pdM1
— Arpit Verma IAS (@arpit_verma13) April 29, 2022
आता सुट्टीच्या या अर्जाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हे सोशल मीडियावर(Social media) सुट्टीचा हा अर्ज अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हाला हा अर्ज कसा वाटला किंवा हा अर्ज वाचून तुम्हाला काय वाटलं, कशाची आठवण झाली? किंवा तुमच्या, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सुट्टीच्या अर्जाचा असा मजेशीर किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.
Smart News:-
Yes Bank आणि DHFL घोटाळा प्रकरणी CBIची छापेमारी
‘द्वेशाचं राजकारण’ प्रकरणी माजी न्यायमूर्तींकडून PM मोंदीची पाठराखण
गणेश नाईकांना सर्वात मोठा झटका, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला, आता कधीही अटक होणार
“मनसेचे हिंदूत्व लोकांना आवडतय; मुख्यमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज”
सव्वा 2 लाखाचा रत्नागिरी हापूस सलग चौथ्या दिवशी रेल्वे स्थानकावर पडूनच