लाखोंच्या मनावर राज्य करणारी हृता विवाहबंधनात…

‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनं प्रियकर प्रतीक शाह याच्यासोबत असणाऱ्या नात्याला नवी ओळख दिली आहे. लाखोंच्या मनावर राज्य करणारी ही मनांची राणी हृता आता मिसेस हृता प्रतीक शाह म्हणून ओळखली जाणार आहे.(in marriage)
नातेवाईक आणि काही मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हृता आणि प्रतीकचा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियावरही तिनं लग्नातील काही खास क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले.(in marriage)
Now and forever असं कॅप्शन तिनं या फोटोंना देत त्यामध्ये लग्नाची तारीखही दिली. ज्या क्षणी हृतानं तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले, तेव्हापासूनच तिच्यावर आणि प्रतीकवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.
लग्नानिमित्त हृतानं सुरेख अशा साडीला प्राधान्य दिलं होतं. त्यावर साजेसे दागिने, मेकअप आणि अर्थातच चेहऱ्यावर असणारी लकाकी हृताच्या लूकला चार चाँद लावून गेली.
कोण आहे हृताचा पती, प्रतीक शाह ?
हिंदी मालिका विश्वात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री मुक्ता शाह यांचा मुलगा म्हणजे प्रतीक. बऱ्याच हिंदी मालिकांचं दिग्दर्शन तो करतो. ‘तेरी मेरी इक जिंदगी’, ‘बेहद २’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दिवाना था’ या मालिकांची नावं त्याच्यासोबत जोडली जातात.
हृता आणि प्रतीची ही जोडी पाहता त्यांच्या प्रेमाच्या मालिकेचीही दणक्यात सुरुवात झाली आहे, ज्याच्या दिग्दर्शनाची धुरा नेमकी कोणाच्या हाती असणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.
हेही वाचा :