तीन दिवसांत ‘हा’ चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये करेल प्रवेश!

अभिनेता रणबीर कपूर(bollywood actress), आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि मौनी रॉय स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यानंतरही चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. अयान मुखर्जीच्या  चित्रपटाने दुसऱ्या दिवशी पूर्वीपेक्षा जास्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रची कमाई अशीच सुरू राहिली तर तीन दिवसांत हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल.

ब्रह्मास्त्रने (bollywood actress)पहिल्या दिवशी जगभरात ७५ कोटी रुपयांची कमाई केली असताना, चित्रपटाने भारतात देशात ३६.५० कोटी रुपयांची कमाई केली. त्यापैकी ३१.५० कोटी रुपयांची कमाई हिंदी व्हर्जनमधून झाली. आता दुसऱ्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर,चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. ब्रह्मास्त्रचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन सुमारे ४२ कोटी रुपये असू शकते, त्यापैकी हिंदीत ३७-३८ कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकते.

bollywood actress

ब्रह्मास्त्र १०० कोटींच्या जवळ

या आकडेवारीनुसार, चित्रपटाने जवळपास ७८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि अशा परिस्थितीत चित्रपट तिसऱ्या दिवशी १०० कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकतो. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या सोबतच चित्रपटाचा पहिला भाग संपल्याने दुसऱ्या भागाच्या ‘ब्रह्मास्त्र 2 : देव’ची उत्सुकता वाढली आहे.

ब्रह्मास्त्राची स्क्रीन काउंट

विशेष म्हणजे, ब्रह्मास्त्र हा २०२२ चाच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीचाही बहुप्रतिक्षित चित्रपट होता. २०२२ हे वर्ष बॉलीवूडसाठी वाईट ठरले आहे आणि अनेक मोठे चित्रपट आपटले आहेत. त्यामुळे व्यापार विश्लेषकांना ब्रह्मास्त्रकडून खूप आशा आहेत. चित्रपटाच्या स्क्रीन काउंटबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाला भारतात ५०१९ आणि परदेशात ३८९४ स्क्रीन मिळाले आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट जवळपास ८९१३ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: