बडे लोग…बडी बाते…लग्नात रणबीरकडे इतक्या कोटींची मागणी…

रणबीर (indian film) आणि आलियाच्या लग्नाला दोन दिवस झाले. त्यांच्या लग्नाला मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रण होतं त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याची मोठी उत्सुकता आहे.. त्यांच्या लग्नातील एक एक किस्से ऐकायला चाहते आतूर झालेत..त्यांच्या लग्नातील असाच एक भन्नाट किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे वाचून तुम्हीही म्हणाल बडे लोग बडी बाते…

तर झालं असं की लग्नात नवरदेवाचे शूज चोरण्याचा प्रकार सर्रास केला जातो त्यामुळे रणबीरलाही या प्रकाराला सामोरं जावं लागलं..मात्र फरक फक्त एवढाच होता की त्याच्याकडे शूज सोडवण्यासाठी 11 कोटींची मागणी आलियाच्या मैत्रिणींनी केली…मग पुढे काय झालं?..(indian film)

indian film

रणबीर हा कपूर खानदानातला असला तरी शूजसाठी 11 कोटी जरा जास्तच ना..मग काय 1 लाखांचा चेक देऊन रणबीरने शूज सोडवल्याची माहिती मिळतेय….रणबीरला शूज 1 लाखाला पडले असले तरी लाडक्या सासूबाईंकडून अडीच कोटींचं बँड्रेड घड्याळही मिळाल्याचं समजतंय…आलियाची आई म्हणजे सोनी राजदन यांनी रणबीरला लग्नात अडीच कोटींचं घड्याळ गिफ्ट केलंय तर आलियाला डायमंड रिंग गिफ्ट केलीय.

मुलगी आलिया आणि जावयाला तर महागडी गिफ्ट मिळालीच पण लग्नाला आलेल्या पाहुणेही रिकाम्या हाती परतले नाहीत…पाहुण्यांसाठी खास काश्मिरी शाल भट कुटुंबीयांनी गिफ्ट दिल्या…एकूणच काय तर अनेक महिन्यांपासून आलिया आणि रणबीरचा विवाह सोहळा अखेर थाटामाटात संपन्न झाला..पाली हिल परिसरातील वास्तू या अलिशान बंगल्यात हा शाही विवाह सोहळा पार पडला….या लग्नासाठी ही ‘वास्तू’ आकर्षक रोषणाईने न्हाऊन निघाली होती तसंच चेंबूरमधील आरे के स्टुडिओवरही रोषणाई करण्यात आली होती…

हेही वाचा :


कोल्हापूर : येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत-सत्यजित कदम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *