ताजमहालच्या ‘त्या’ 22 बंद खोल्यांमध्ये दडलंय काय? पहिल्यांदाच फोटोसमोर

ASI

जगप्रसिद्ध असणारे ताज महलातील 22 खोल्या उघडण्यावरुन वाद निर्माण झाला होता.या 22 खोल्यांमध्ये नेमकं काय दडलंय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने पहिल्यांदाच या खोलीतील काही फोटो शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे, ASI ने सर्व फोटो त्यांच्या वेबसाईटवर शेअर केले आहेत.

ASI कडून 22 खोल्यांचे फोटो शेअर –
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने 22 खोलींचे फोटो शेअर केले आहे. खोल्यांची डागडुजी केल्यानंतर हे फोटो काढल्याची माहिती समोर आली आहे. प्लास्टर करण्यासाठी खोल्या उघडण्यात आले असल्याचे समजते आहे. जवळपास 6 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

ताजमहलच्या 22 खोल्या उघडण्याची याचिका –

ताजमहालमधील 22 खोल्या उघडण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. आरटीआय (RTI) अर्जाद्वारे याचिकाकर्त्यांने खोल्या उघडून चौकशी करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात डॉ. रजनीश सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती.

कोण आहेत डॉ.रजनीश सिंह?
डॉ.रजनीश सिंह हे अयोध्येतील रहिवासी आहेत.तसेच डॉ.सिंह हे भाजपचे कार्यकर्ते आहे. नेमकं ताजमहलाच्या 22 खोल्यामंध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी याचिका केली होती.

याचिकेवर कोर्टाचा काय निर्णय?
अलाहाबाद कोर्टाने डॉ.रजनीश सिंह यांच्या याचिकेला फेटाळून लावले.तसेच याचिका न्यायालयीन मुद्द्यांवर आधारित नसल्याचे याचिकाकर्त्याला सुनावले. याचिकेवर सुनावणी करणे अशक्य आहे(ASI). या प्रकरणी शोध समिती स्थापना करु शकत नाही, असंही यावेळी म्हटलंय.

Smart News:-

अभिनेत्री अमृता सुभाषला स्वतःच्या बर्थडेपेक्षा नवऱ्यानं काढलेल्या फोटोचं जास्त कौतुक;


“सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच काढता पाय घेतला”; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला


आता अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर, संकट टाळणे कठीण, गोल्डमॅनच्या तज्ज्ञांचा दावा


‘हे’ पान खाल्ल्यानं होतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या


आईची काळजी घेण्यासाठी मोठे घर नाही तर मोठे हृदय लागतं


1 thought on “ताजमहालच्या ‘त्या’ 22 बंद खोल्यांमध्ये दडलंय काय? पहिल्यांदाच फोटोसमोर

  1. Good post. I learn something totally new and challenging on blogs I stumbleupon every day. It will always be interesting to read through articles from other writers and use a little something from other sites.

Leave a Reply

Your email address will not be published.