करिअर वाचवण्यासाठी अभिनेत्रीनं केलं अस काही वाचून धक्काच बसेल!

अनेकदा काही गोष्टी मिळवण्यासाठी किंवा त्या साध्य करण्यासाठी आपण अक्षरश: पेटून उठतो. अमुक एक गोष्ट हवीच या हल्लानं जेव्हा आपण एका दिशेला पावलं टाकतो, तेव्हा आपली काही पावलं चुकीच्या दिशेनंही जातात.(career)

असंच एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबतही घडलं. या अभिनेत्रीनं (career) करिअरच्या एका वळणावर चक्क मंत्रतंत्रांचा आधारही घेतला. कोणताही पर्याय उरलेला नसताना अखेर तिनं ही वाट निवडली.

ही अभिनेत्री आहे पायल रोहतगी. एका रिअॅलिटी शोमध्ये पायलनं याचा खुलासा केला. तिचं हे बोलणं ऐकून क्वीन कंगनाही हादरली.

रिअॅलिटी शोच्या बाद फेरीतून वाचण्यासाठी म्हणून सहभागी स्पर्धकांनी काही धक्कादायक खुलासे करणं अपेक्षित होतं. ज्यामध्ये पायलनंही एक खुलासा केला.

‘मी 15 वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये आहे. पण, एक वेळ अशी आली जेव्हा माझं करिअर गटांगळ्या खाऊ लागलेलं. मी करिअरला पुढे नेण्यासाठी तांत्रिक पूजा करत होते. मी वशीकरणही केलं होतं. पण, या साऱ्याचा काहीच फायदा झाला नाही’, असं ती म्हणाली.

पायलचं हे बोलणं ऐकून कंगनाला धक्काही बसला आणि हसूही आलं. तू इतकी कलागुणसंपन्न आहेस की तुला या मंत्रतंत्रांची काही गरजच नाही, तू सहजपणे लोकांची मनं ताब्यात घेऊ शकतेस, असंही कंगना म्हणाली.

हेही वाचा :


क्रिकेट जगतात खळबळ, दिग्गज खेळाडूंवर गंभीर आरोप..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *