अभिनेत्रीच्या ड्रेसवर चढला व्यक्ती, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

jasmin basin dress

बिग बॉस 14′ (Bigg Boss 14) मधील जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) हीचा खास अंदाज लोकांना अतिशय भावला. जास्मिन घराबाहेर आल्यानंतरही चर्चेत राहिली. ती कायम आपला बॉयफ्रेड अली गोनी (Aly Goni) सोबत दिसली आहे. दोघांची जोडी देखील प्रेक्षक खूप पसंत करतात. आता देखील जास्मिन चर्चेत आली, पण एका वेगळ्या कारणामुळे. जैस्मिनचा (dress ) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकताचं जास्मिनला ‘वुमेन ऑफ द ईयर’ चा अवॉर्ड मिळाला. अवॉर्ड घेवून येताना तिच्या ड्रेसवर (dress ) एका व्यक्तीचा पाय पडतो. तेव्हा जास्मिन मागे वळून त्या व्यक्तीला पाहते आणि पुढे निघून जाते. तिच्या या व्हिडीओवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत.

जास्मिन भसीन तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती अभिनेता अली गोनीला डेट करत आहे. दोघांचं प्रेम बिग बॉसच्या घरातच फुललं.

जास्मिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘दिल से दिल तक’, ‘बेलन वाली बहू’, ‘नागिन’ आणि ‘तू आशिकी’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.


हेही वाचा :


“ठाकरे अन् पवारांना फडणवीसच गुंडाळणार”


आता गंगुबाई येणार ओटीटीवर, जाणून घ्या रिलिज डेट


‘अरे घे ना DRS’! रिव्ह्यू घेण्यासाठी पंतने रोहितचं मन वळवलं आणि…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *