५३ व्या वर्षी केलं न्यूड फोटोशूट, चौथं लग्न करून आली चर्चेत

गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझने (jennifer lopez) आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला. तिने तिच्या  वाढदिवसानिमित्त न्यूड फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच तिने या फोटोशूटचा व्हिडिओही शेअर केला आहे. तिचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही की, लोपेज ५३ वर्षांची आहे. याआधी जेनिफर वयाच्या ५२ व्या वर्षी न्यूड फोटोशूट करून चर्चेत आली होती.

वेगवेगळी पोज देत जेनिफर लोपेजने (jennifer lopez) आपल्या बॉडीवर लोशन लावलं आणि व्हिडिओ संपताच हसू लागली. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी म्हटलं की, ‘अशी दिसते ५३ व्या वर्षी व्यक्ती’. दुसऱ्या इन्स्टाग्राम युजरने म्हटलंय, ‘जगतील सर्वात सुंदर महिला’.

जेनिफर लोपेजच्या स्किनकेअर लाईन JLO ब्युटीनेदेखील आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर फोटोंची एक सीरीज शेअर केलीय. यामध्ये तिने न्यूड फोटोशूट केले आहेत.

jennifer lopez

हॉलीवूड पॉप सिंगर-अभिनेत्री जेनिफर लोपेज  चे लाखो चाहते आहेत. ती एक उत्तम गायिका, डान्सर आणि अभिनेत्री आहे. या वयातही ती हॉलीवूड सेलिब्रिटींना मात देते. जेनिफरने अभिनेता बेन एफ्लेक  शी लग्न केले हते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.

jennifer lopez

OTT प्लॅटफॉर्म Netflix वर जेनिफर लोपेझवरील माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. त्याचे नाव ‘हाफटाईम’ होते. १ तास ३५ मिनिटांच्या या शोमध्ये अमेरिकन सुपरस्टारच्या आयुष्याशी संबंधित असे काही खुलासे झाले होते. ‘हाफटाईम’ या माहितीपटात जेनिफरने २०२० च्या एका प्रसंगाचा उल्लेख केला होता. तिला वर्णद्वेषी वागणूक देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

jennifer lopez

जेनिफर लोपेझनेही डॉक्युमेंट्रीमध्ये तिच्या आईसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला. आई लूप रॉड्रिग्जबद्दल बोलताना तिने सांगितले की, नृत्याच्या प्रेमामुळे तिचे आईसोबतचे नाते बिघडले होते. शालेय जीवनात तिचे लक्ष अभ्यासाकडून नृत्याकडे वळले. जेनिफर पुढे सांगते की, तिची आई खूप कडक होती. ती त्याला खूप मारायची.

चौथे लग्न करून चर्चेत आली होती

गायिका आणि अभिनेत्री जेनिफरने तीनदा लग्न केले आहे. प्रोफेशनल लाईफसोबतच ती तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते.
बेनशी चौथे लग्न करून जेनिफर चर्चेत आली होती. याआधी तिने तीनदा लग्न केले आहे. तिने १९९७ मध्ये ओझानी नोआशी लग्न केले. एका वर्षानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर तिने २००१ मध्ये क्रिस जडशी लग्न केले. या दोघांचे दोन वर्षांनी ब्रेकअप झाले. जेनिफरने २००४ मध्ये मार्क अँथनीसोबत तिसरे लग्न केले होते आणि १० वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

जेनिफरचे बेन ऍफ्लेकसोबतचे नाते काही पहिल्यांदाच नाही. दोघांनी २००२ मध्ये डेट केले होते. दोघांचीही एंगेजमेंट झाली होती, पण हे नातं फार काळ टिकलं नाही. दोघे वेगळे झाले. यानंतर पुन्हा दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि अखेर त्यांनी लग्न केले.
‘सेलेना’ या चित्रपटात जेनिफरला पहिली प्रमुख भूमिका मिळाली. ती एक स्टार म्हणून इंडस्ट्रीत स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली. जेनिफरने बूटी, ऑल आय हॅव, लव्ह डोन्ट कॉस्ट अ थिंग, सेम गर्ल, लेट्स गेट लाऊड, आय एम रियल, ऑन द फ्लोर अशी अनेक हिट गाणी दिली आहेत.

Smart News :


कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published.