‘मी त्रासले होते…’,शाहिदसोबत रात्र घालवल्यानंतर अभिनेत्रीची नाराजी!

kangana ranaut

वादाचा मुकूट कायम डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत (kangana ranaut) कायम तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर तिचे काही जुने किस्सी देखील अनेक वेळा चर्चेत असतात. आता कंगना अभिनेता शाहिद कपूरसोबत घालवलेल्या त्या एका रात्रीमुळे चर्चेत आली आहे. हा किस्सा ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कंगनाने सांगितले की, तिने शाहिदसोबत रात्र घालवली आहे. त्यामुळे ती खूप अस्वस्थ होती.

त्या रात्रीबद्दल सांगताना कंगना (kangana ranaut) म्हणाली, ‘रंगून सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. शुटिंगनंतर सर्वांना एका ठिकाणी राहायचं होतं. पण राहण्यासाठी खोल्यांची संख्या कमी असल्यामुळे कंगना आणि काही क्रू मेंबर्सना एकाच खोलीत राहावे लागले.’

kangana ranaut

त्यावेळी शाहिद आणि क्रू मेंबर्स रात्रभर गाणी गातं राहिले, ज्यामुळे कंगनाला झोप लागत नव्हती. त्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि ती रात्र त्रासदायक ठरली. कंगनाचा हा किस्सा सध्या तुफान व्हायरल होत आहे.

कंगना रानौतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘तेजस’, ‘टिकू वेड्स शेरू’, ‘धाकड’ सारख्या अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहे. तिच्या सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.

हेही वाचा :


पेट्रोल-डिझेल दर कमी होणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *