कपिल शर्मा पुन्हा एकदा या कारणामुळे चर्चेत..!

‘द कपिल शर्मा’शो मध्ये मोठ-मोठे कलाकार येऊन चित्रपटाच प्रमोशन (promotion) करताना दिसतात. हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या शोचं नावही अनेक वादांशी जोडलं गेलं आहे. नुकताच ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आरोप केला होता की, कपिलने त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला आहे.
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही शो बंद करण्याची मागणी सुरू झाली. मात्र अनुपम खेर यांनी यावर स्पष्टीकरण देत असं काही नसल्याचं सांगितलं तेव्हा हे प्रकरण शांत झालं. पण तुम्हाला माहिती आहे का की, हे पहिल्यांदाच नाही की कपिल शर्माने एका चित्रपटाचं प्रमोशन करायला नकार दिला आहे. या आधी त्याच्या शोमधल्या एका सहकलाकाराने त्याच्यावर हाच गंभीर आरोप लावला होता.
या शोमध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या सुमोना चक्रवर्तीच्या चित्रपटाचं प्रमोशन (promotion) करायला त्याने नकार दिला होता. सुमोनाचा हा व्हिडिओ बराच जुना आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान कपिल नेहमीप्रमाणे सुमोनाची खिल्ली उडवताना दिसत आहे. यादरम्यान सुमोना म्हणते की कपिलला माझा हेवा वाटतो. खरं तर हे सर्व शोच्या अभिनयाचा भाग होता आणि हे सर्व विनोदी पद्धतीने सांगण्यात आलं. सुमोनाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सुमोना आज एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, जरी खूप कमी लोकांना माहीत असेल की तिने १९९९ मध्ये आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्या ‘मन’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यानंतर तिने पुढील काही वर्ष काही मालिकांमध्ये काम केलं, पण २०११ मध्ये बालाजी टेलिफिल्म्स निर्मित ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतील नताशाची भूमिकेमुळे तिला खरी ओळख मिळली. ‘मन’ व्यतिरिक्त तिने ‘आखरी निर्णय’, ‘बर्फी’, ‘किक’ आणि ‘फिर से’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा :