करण जोहर बेधडक म्हणाला ‘करीना कपूरला डेट करायचं होतं’!

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच करण जोहरने एका कार्यक्रमात ‘आपल्याला करीना कपूरला डेट (today’s date) करायचे होते’ असे म्हटले आहे.
त्याच्या या वक्तव्यामुळे करण चांगलाच चर्चेत आला आहे. करण जोहर (today’s date) आणि करीना कपूर खान यांची चांगली मैत्री आहे. दोघांनी अनेकदा एकत्र काम केले आहे. यासोबतच दोघेही एकत्र पार्ट्यांमध्ये दिसतात. पण, एकदा करण जोहरने सर्वांसमोर जाहीर केले होते की, त्याला करीना आवडते. त्याला करीनासारखी पत्नी हवी असल्याचेही त्याने म्हटले.
करण जोहर नुकताच अनिता श्रॉफ अदजानियाच्या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान त्याने याचा खुलासा केला होता. अनिताने करणला विचारले की, तुला कोणाशी लग्न करायचे आहे का? यावर करणने करीनाचे नाव घेतले. तो म्हणाला की, माझ्या जीवनसाथीमध्ये असावेत असे सर्व गुण करीनामध्ये आहेत.
डेट करण्याची संधी मिळाली तर…
करण जोहर म्हणाला की, जर त्याला कधी कोणाला डेट करण्याची संधी मिळाली तर, ती व्यक्ती करीना कपूर असेल. करीना आणि करणने ‘कभी खुशी कभी गम’, ‘वी आर फॅमिली’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘गुड न्यूज’ यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. करण जोहर नेहमीच त्याच्या शोमुळे चर्चेत असतो. करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो खूप लोकप्रिय झाला आहे. या शोमुळे करण जोहर दररोज सोशल मीडियावर चर्चेत असतो. मात्र, आता करण त्याच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
Smart News :
- दीपिका होणार रणबीरची आई बातमी आली समोर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शिंदेही देणार मदत…
- शहनाज गिल वर नाराज झाले चाहते