करण जोहरने रणवीर सिंगसाठी लिहिली चिठ्ठी, म्हणाला रणवीर.

Ranveer Singh

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. अनेक स्टार्सही अभिनेत्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्याचवेळी अशा वातावरणात चित्रपट दिग्दर्शक करण जोहरची एक लव्ह नोट समोर आलीये. जी त्याने रणवीर सिंगसाठी लिहिली आहे.

करण म्हणाला, माझ्या मनात असलेली ही फक्त एक भावना आहे जी मला सर्वांसोबत शेअर करायची आहे. मी रणवीर सिंगच्या(Ranveer Singh) प्रेमात पडलोय. माझ्या संपूर्ण चित्रपटात मी त्याला जवळून आणि दूरून पाहिले आहे की तो किती भक्कम माणूस आहे. होय, एक कलाकार म्हणून त्याची स्वतःची खासियत आहे.

करण जोहरची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना तसेच सेलिब्रिटींनाही आवडली आहे. अनिल कपूरनेही त्याची ही पोस्ट लाईक केली असून त्याने हार्ट इमोजी शेअर केला आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की लवकरच रणवीर सिंग(Ranveer Singh) आणि आलिया भट्ट करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Smart News:-

‘अजूनही मला विचारलं तर मी बिग बॉस मराठी 4 होस्ट करायला तयार आहे’, महेश मांजरेकरांचा खुलासा


मंकीपॉक्‍सचा वाढता प्रादुर्भाव : अमेरिकेने घेतला ‘मोठा’ निर्णय


पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे 14 रुग्ण; तीन वर्षांनंतर आढळले रुग्ण


डेड बॉडी सडत होती, तरीही FTII प्रशासनाला कळलं कसं नाही?


Leave a Reply

Your email address will not be published.