Kartik Aaryan शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

कलाविश्वात कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. यशाच्या उच्च शिखरावर चढत असताना येत असलेल्या अडचणींवर काही कलाकार मात करण्यास फेल ठरतात, तर काही मात्र विश्वासाच्या बळावर स्वप्न पूर्ण करतात. अशाचं अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनता कार्तिक आर्यन. दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या कार्तिकने आपल्या शिरपेचात शिरपेचात आणखी एक (vikram) मानाचा तुरा रोवला आहे.

कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री किआरा अडवाणी स्टारर ‘भूल भुलैया 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. महत्त्वाचं शनिवार-रविवार असल्यामुळे निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी बॉक्स ऑफिसवर आणखी तगडी कमाई होऊ शकते… अशी शक्यता वर्तवली आहे.

कार्तिकच्या सिनेमाला मिळत असलेलं प्रेम पाहून अभिनेता प्रचंड आनंदी आहे. सध्या कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने आनंद व्यक्त केला.(vikram)

व्हिडीओमध्ये कार्तिक म्हणतो, ‘सिनेमाच्या कमाईने 100 कोटींचा गल्ला पार केला आहे, ही आनंदाची बाब आहे. इथे सगळे सारखेच पदार्थ खातात. मी काय करू शकतो? सिनेमाने 100 कोटींची कमाई केली असून मी येथे पापड खात आहे.’ पाहा कार्तिकचा व्हिडीओ…

‘भूल भुलैया 2’ मध्ये किआरा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा मुख्य भूमिका आहेत. सिनेमा 2007 मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ या लोकप्रिय सिनेमाचा सिक्वेल आहे.

अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या आठव्या दिवसापर्यंत 98.57 कोटी रुपयांची कमाई केली होती. शनिवारी सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला. तर रविवारी किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल, हे पाहाणं महत्त्वाचं ठारणार आहे.

हेही वाचा :


हुंडाबळी! तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *